आरबीआयकडून रेपो व्याज दरात वाढ

०७ डिसेंबर २०२२


भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या पतधोरणाची घोषणा केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात ०.३५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर रेपो दर आता ६.२५ टक्के इतका झाला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे आता सामान्यांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ झाली आहे.

सामान्यांच्या कर्जाच्या हप्त्यात वाढ होणार

रिझर्व्ह बँकेची पतधोरणविषयक बैठक सोमवारपासून सुरू होती. त्यानंतर आज आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत देसाई यांनी पत्रकार परिषदेत पतधोरण जाहीर केले. त्यांनी म्हटले की, आपण आणखी एका आव्हानात्मक वर्षाच्या अखेरीस आले आहोत. देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये महागाईचा दर वाढला आहे. जगातील भूराजकीय परिस्थितीमुळे देशातील पुरवठा साखळीवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आव्हाने निर्माण झाले असल्याचे शक्तिकांत दास यांनी म्हटले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *