शिरुर लोकसभा मतदार संघ महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रिय मंत्री रामदासजी आठवले यांची जाहिर सभा रामटेकडी, हडपसर येथे पार पडली. जेष्ठ नागरीक, माता भगिनी व तरुण तडफदार युवक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. प्रचंड गर्दी आणि जोरदार प्रतिसाद याठिकाणी सभेला लाभला.
आठवले साहेब –
– मी महाराष्ट्रभर फिरत आहे जय भीम जय महाराष्ट्र गिरवण्यासाठी आणि मी शिरूर मध्ये आलो आहे अमोल कोल्हेंना हरवण्यासाठी.
– माझा जरी छोटा पक्ष आहे पण इमानदार फौज असणारा पक्ष आहे.
– गावागावात गेलो म्हणते तेथील म्हातारी आता निवडून येणार नाही अमोल कोल्हे ची तुतारी.
– जर कोणी म्हणत असेल लोकशाही आली आहे धोक्यात तर त्याला घालून टाकीन मी खोक्यात
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान कोणी बदलू शकत नाही. कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर मी टर टर फाडून टाकेल.
– डरने की नही है बात आढळगाव का बढाना है हात
– आढळराव पाटील अमोल कोल्हे चे डॅडी कारण त्यांची आहे मजबूत बॉडी
दादा – पंधरा वर्षे मी या विभागांमध्ये काम केला आहे. नेहमी हा विभाग माझ्या पाठीशी राहिला. माझा हा दलीत वर्ग मोठा कष्टकरी आहे. दहा लाख रुपये ज्या ज्या गावांमध्ये बौद्ध विहार असतील तिथे दिला. असे एकूण एक करोड रुपये दिला. ही वेळ आता मोदींच्या पाठीमागे उभे राहण्याची आहे. केंद्रातून पंतप्रधानाच्या विचाराचा प्रतिनिधी निवडून दिल्यावर निधी आणण्यासाठी सक्षम असेल.
केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, आरपीआय पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महाराष्ट्र संघटक सचिव परशुरामजी वाडेकर, अल्पसंख्यांक महाराष्ट्र अध्यक्ष आय्युब भाई शेख, आमदार चेतन तुपे, शिवसेना पुणे शहर अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, मतदार संघाचे अध्यक्ष महादेव दंदी, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष शशिकला वाघमारे, पुणे शहर उपाध्यक्ष महादेव कांबळे, पुणे शहर उपाध्यक्ष संतोष खरात, युवक अध्यक्ष हडपसर विधानसभा राजू कांबळे, पुणे शहर कार्याध्यक्ष महिला आघाडी मीनाताई घालते, कामगार आघाडी पुणे शहर रामभाऊ करपे, वाहतूक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष यादव हरणे,
पुणे शहर महिला आघाडी उपाध्यक्ष निंबोणीताई वाघमारे, हडपसर विधानसभा महिला अध्यक्ष मिनाज मेमन, श्रमिक बीग्रेड पुणे शहर अध्यक्ष सुरज गायकवाड, भाजप अध्यक्ष संदीप दळवी, अल्पसंख्यांक आघाडी पुणे शहराध्यक्ष इम्तियाज मोमीन, संघटन सरचिटणीस गणेश घुले, महाराष्ट्र संघटक यशवंत भाऊ नडगम शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश नागडे शाखाप्रमुख उपविभाग प्रमुख प्रभाकर पवार शहर संघटक अण्णा सिंग कल्याणी शाखाप्रमुख अनिल गावडे शाखाप्रमुख तुकाराम पवार रमेश शिंदे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.