कुर्ला-बोरी नवीन एसटी बस सुरू…सहा वर्षपासून ची प्रतीक्षा संपली,बोरीकरांच्या आनंदाला उधाण…

जुन्नर विभागीय संपादक रामदास सांगळे:-

बोरी बुद्रुक :- कुर्ला आगाराने कुर्ला- बोरी ही नवीन एसटी बस सुरू केल्याने बोरी ग्रामस्थांनी एसटीचे आनंदाने स्वागत केले.
बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) या गावात गेली ६ वर्षांपासून मुंबईकडे प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेली मुंबई -बोरी एसटी बंद झाली होती.मुंबई वरून गावकऱ्यांचे येण्याजाण्याचे साधन बंद झाले होते.बुधवार (दि.१०) मार्च रोजी कुर्ला – बोरी ही नवीन एसटी सुरु झाली.ही बस मुंबई (कुर्ला) येथून रोज सकाळी ६:३० मिनिटांनी सुटेल तर बोरीत दुपारी १२:३० वाजता पोहचेल. बोरी येथून रोज दुपारी १२:३० वाजता सुटेल बोरी-आळेफाटा-नारायणगाव-चाकण-तळेगाव-लोणावळा मार्गे कुर्ला (मुंबई) ला पोहचेल. ही बस सुरू झाल्याने बोरीकरांच्या आनंदाला उधाण आले आहे. मुंबईच्या प्रवासासाठी महत्त्वाचे दळणवळणाचे साधन म्हणून बोरीकरांनी सर्वच एसटी आगारांना एसटी सुरू करण्याबाबत विनंती केली होती. या कामी सुनील जाधव व पांडुरंग जाधव यांनी एसटी सुरू करण्यासाठी मोठे योगदान दिले.लालपरीचे आगमन होताच गावकऱ्यांनी एसटीचे वाजत-गाजत स्वागत करून चालक एस.एस.इधाटे व वाहक एस.बी.उमप यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळेस बोरी गावचे विद्यमान सरपंच वैशाली जाधव, उपसरपंच दिनेश जाधव सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासाठी कुर्ला आगार प्रमुख राजपूत,आणि विभाग नियंत्रक ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मोलाचे सहकार्य केले.