जुन्नर तालुक्यात ५८ टक्के मतदान…आजी-माजी खासदारांच्या कार्यकर्त्यांचा विजयाचा दावा

जुन्नर तालुक्यात ५८ टक्के मतदान

आजी-माजी खासदारांच्या कार्यकर्त्यांचा विजयाचा दावा

नारायणगाव (सा.वा.)
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आज सायंकाळी सहा वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली जुन्नर तालुक्यामध्ये एकुण ५८ टक्के मतदान झाले असून एकूण ३ लाख १२ हजार मतदान पैकी १ लाख ३३१ पुरुष व ८१ हजार २०६ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर एका तृतीयपंथी मतदाराने मतदान केले असे एकूण १ लाख ८१ हजार ५३८ मतदारांनी जुन्नर तालुक्यात मतदान केले असून शेकडा ५८.१५ % मतदान झाले असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातील पदाधिकारी थोरवडे भाऊसाहेब यांनी दिली.
आज सहा वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर नारायणगाव (तालुका जुन्नर) येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांनी व पाठीराख्यांनी आमचाच खासदार विजय होणार असा परस्पर दावा केला आहे.
यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे (उद्वव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे, तसेच माजी उपसरपंच संतोष वाजगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, आरिफ आतार, शिवसेनेचे रशीद इनामदार, दिलीप वाजगे, रामदास बाळसराफ, विजय मुनोत, संतोष पाटे, समीर इनामदार ईश्वर पाटे, विकास तोडकरी, राजेश पाटे, अजित वाजगे, बाळा वाव्हळ तसेच महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
दरम्यान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचाच यावेळी विजय होणार असल्याचा दावा भाजपचे जिल्हा पदाधिकारी आशिष माळवदकर व योगेश गांधी यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *