२७ तृतीयपंथीय कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांची मुदतवाढ

०७ डिसेंबर २०२२

पिंपरी


पालिकेच्या सुरक्षा विभागात रखवालदाराचे मदतनीस व ग्रीन मार्शल पथकासाठी कर्मचारी म्हणून २७ तृथीयपंथीयांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचा सहा महिन्यांचा कालावधी संपत आल्याने दोन महिन्यांची मुदतवाढीसह येणाऱ्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समिती सभेत मंजुरी दिली आहे. सुरक्षा विभागातील रखवालदाराचे मदतनीस व ग्रीन मार्शल पथकात कर्मचारी म्हणून तत्कालिन आयुक्त राजेश पाटील यांनी २७ तृतीयपंथीयांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली होती.

एमके फॅसिलिटीज सर्व्हसेस (अ व फ क्षेत्रीय कार्यालय) 8 कर्मचारी, नॅशनल सिक्युरिटी सर्व्हसेस (ब व ग क्षेत्रीय कार्यालय) : कर्मचारी, सैनिक इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरिटी (क व ई क्षेत्रीय कार्यालय) ७ कर्मचारी आणि क्रिस्टल इंटेग्रेटेड सर्व्हसेस ४ तृतीयपंथी कर्मचारी नेमले आहेत. त्यांचा १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२२ असा सहा महिन्यांचा कालावधी आहे. त्यांना १८ हजार ५७० रूपये असे एकत्रित दरमहा वेतन आहे. सहा महिन्यांचा कालावधी संपत आल्याने त्यांना १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ असा दोन महिन्यांची मुदतवाढीसह होणाऱ्या खर्चास आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *