पोलिस हवालदार दिपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले यांचा पोलीस महासंचालक पदक देऊन गौरव
(नारायणगाव :- किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
आज महाराष्ट्र दिन एक मे निमित्त महाराष्ट्र पोलीस दलातर्फे दिले जाणारे पोलीस महासंचालक पदक या वर्षी स्थानिक गुन्हे शाखे मध्ये काम करण्याऱ्या पो.हवा. दिपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले यांना पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले.
या तिघांनी गुन्हे शाखे मध्ये काम करत असताना अनेक गुन्ह्यांचा शोध लावला आहे . त्यातील महत्त्वाचे म्हणजे पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँक दरोडा, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील मोठे दरोडे, अनेक खून, अनेक जबरी चोऱ्या यांसारख्या अनेक गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक केली आहे.
प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला खुनातील संशयित आरोपी संतोष जाधव याला गुजरात येथून,, महाराष्ट्रातून महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक करून त्याची संपूर्ण टोळी पकडून त्यांच्याकडून एकूण १५ पिस्टल जमा केल्या होत्या. याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र पोलीस दला तर्फे या तिघांना जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक देऊन आज गौरविण्यात आले.