आत्महत्या करू नका – जाहीर आवाहन
आळंदी : आपण आपल्या ध्येयावर ठाम राहणे. मराठ्यांचा विजयाचा गुलाल लवकर उधळणार आहे. मराठा आरक्षणाची लढाई आता अंतीम टप्प्यात आली आहे. माऊलींच्या पवित्र भूमीचा आशीर्वाद ही मिळाला… राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचे आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार, घटना घडणार नाही याची दक्षता घेण्यास जागृत रहा…समाजातील युवक तरुणांनी आरक्षणाचे मागणीस आत्महत्या करू नये… आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. मराठा समाजास आरक्षण हे मिळणार आहे. मात्र त्यासाठी सर्वानी जागृत राहून जनजागृती करण्याची गरज असल्याचे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आळंदी येथील जनसंवाद यात्रेत सांगितले.
सकल मराठा समाज खेड तालुका, आळंदी देवाची, मराठा क्रांती मोर्चा खेड तालुका, आळंदी सर्कल पंचक्रोशी तर्फे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आळंदीत जाहीर जनसंवाद सभा झाली. या
सभेस पहाटे मार्गदर्शन करताना जरांगे पाटील बोलत होते. यावेळी आळंदीतून भव्य मिरवणूक हरिनाम गजरात, मराठा समाजास आरक्षण मागणीस जोरदार घोषणात देत भव्य मिरवणूक झाली. यावेळी चाकण चौकात ३० फूट लांबीचा भव्य हार क्रेनचे सहाय्याने जरांगे पाटील यांना घालीत मिरवणूक चाकण चौक, भैरवनाथ चौक, पोलीस चौकी मार्गे शिव स्मारक येथे आली. या ठिकाणी हजारो समाज बांधवांचे उपस्थितीत भव्य सभा झाली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. आळंदी पंचक्रोशीतून जरांगे यांचे सभेस समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. रात्री उशिरा मोठ्या संख्येने आलेला समाज पाहून ते म्हणाले पहिल्यांदा असे घडले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपले प्रेम मिळाले. यावेळी आळंदीतून तून त्यांनी राज्यातील महाराज मंडळींना आवाहन केले. समाजाचे पाठीशी असेच कायम उभे रहा. कायद्यात सर्व नियमांचे पालन करीत उपोषण आंदोलन केले होते, मात्र शांततेत आंदोलन सुरु होते. पूर्ण गाव उपोषणात होते. मात्र सरकारने भ्याड हल्ला केला. यात अनेक माता माऊलींच्या डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या. अनेक टाके पडले. अनेकांचे डोके रक्ताने माखले. असे असताना देखील आंदोलन कर्ते मागे हटले नाहीत. मुलांच्या पोटात या घटनेतील अजून ही गोळ्या आहेत. इतके निर्दयी सरकार पहिल्यांदा पाहिले. पोरांना मारलं असत तर काही वाटलं नसत. मात्र त्या निष्पाप माता माऊली यांना हि मारहाण झाली. अनेकांचे हात पाय मोडले. न्यायासाठी स्वतःच्या लेकरांचे शांततेत असलेले आंदोलन मोडून काढण्याचे काम त्यांनी केले. या घटनेतील बाधितांना अजूनही लोकांना चालता हि येत नाही. या जनसंवाद सभेत त्यांनी झालेल्या हल्ल्याची सविस्तर माहिती देत संवाद साधला. राज्यातील काना कोपऱ्यातील मराठा समाज एकजुटीने उभा राहिला आहे. करोडोच्या संख्येने माय बाप मराठ्यानो इतका मार खाऊन शांततेच आंदोलन केलं. तुम्ही ही शांततेत आंदोलन करा. राज्यातील काही महंत, महाराज मंडळींना जरी त्रास झाला असला. तरी या समाजासाठी सहन करा. पुढे दिवस आपले सुध्दा आहेत. आपल्याला लढाई आता जिंकायची. आळंदीतील तुमच्यातील उत्साह जोश पाहून मला काय करावं ते कळेना. इतक्या शांत भूमीत पवित्र भूमीत सगळे महंत एवढा जोश असेल वाटलं नव्हतं. एव्हढा जोश पाहिल्यावर भूक लागली नाही. त्यांनी आपल्या प्रकृती बाबत संवाद साधत दौऱ्यातील माहिती दिली. व्यस्त दौऱ्या असल्याने सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन केले. राज्य सरकार, आंदोलन कर्ते, विरोधक यांचा हि समाचार घेत त्यांनी मराठा समाजाला १ डिसेम्बर पासून सर्व गावात साखळी उपोषण शांततेत करण्याचे आवाहन केले. २४ डिसेम्बर पर्यंत आरक्षण जाहीर करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. सुमारे २९ लाखावर नोंदी आढळून आल्याचे सांगत आता मराठा आरक्षण घेतल्या शिवाय एक इंच हि मागे हटणार नसल्याचे ग्वाही त्यांनी दिली. सकाळी माऊली मंदिरात श्रींचे दर्शन घेत तुळापूर मार्गे पुढील सभेत ते रवाना झाले. माऊली मंदिरात विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी श्रींचा प्रसाद भेट देत देवस्थान तर्फे स्वागत स्वतःकर केला. यावेळी समाज बांधव उपस्थित होते. आळंदी पोलीस स्टेशन तर्फे चोख पोलीस बंदोबस्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी तैनात केला होता. शांततेत सभा, मिरवणूक झाली. चिंबळी येथील सिद्धेश बर्गे या युवकाने मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी आत्महत्या केली. बर्गे कुटुंबियांना भेटून जरांगे पाटील यांनी सांत्वन केले. राज्य शासनांकडून मदत व नोकरी देण्यास प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. सभेचे नियोजन आळंदी सकल मराठा समाज यांचे वतीने उत्साहात करण्यात आले. युवक तरुण कार्यकर्ते यांनी जेष्ठ समाज बांधवांचे मार्गदर्शनात परिश्रम पूर्वक नियोजन केल्याने मिरवणूक, सभा यशस्वी झाली.