नारायणगाव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

नारायणगाव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

नारायणगाव :- (किरण वाजगे , कार्यकारी संपादक). .
नारायणगाव ता. जुन्नर येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाणिज्य विभाग, वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय आंतरशाखीय परिषद आयोजित करण्यात आली होती.
या आंतरराष्ट्रीय परिषद” सस्टेनेबल प्रॅक्टिसेस अँड ट्रेंड्स इन कॉमर्स, मॅनेजमेंट,सायन्सेस, एग्रीकल्चर, एज्युकेशन,लॉ इंजीनियरिंग, हेल्थ आणि फार्मसी” या आंतरशाखीय विषयांवर घेण्यात आली. वाणिज्य विभाग आणि वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्राचे आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित करण्याचे हे सातवे वर्ष आहे. सदर परिषदेस जगभरातून बँकॉक देशातील पुकेत व थायलंड, दुबई, शारजा, अबुधाबी, टोरंटो – कॅनडा, बांगलादेश त्याचबरोबर रायपूर, छत्तीसगड, कर्नाटक,गोवा, रांची, दिल्ली, पटना- बिहार,भागलपूर -बिहार येथून ७० प्राध्यापक, इंजिनीयर, वकील, डॉक्टर्स,संशोधक आणि १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. १३० संशोधन निबंध प्रकाशित करण्यात आले. परिषदेमध्ये ३० प्राध्यापकांनी आणि १४ विद्यार्थ्यांनी संशोधन निबंधाचे सादरीकरण केले,अशी माहिती संशोधन विभाग प्रमुख प्रा. डॉ.जे.पी.भोसले आणि प्राचार्य ए.बी.कुलकर्णी यांनी दिली.


आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन के.के मोदी विद्यापीठ, दुर्ग,छत्तीसगड येथील कुलगुरू डॉ मोनिका शेट्टी – शर्मा यांनी केले. प्रमुख पाहुणे पोर्णाखोन राजाभट युनिव्हर्सिटी,बँकॉक- थायलंड येथील डॉ.अरुण चैनीत,डॉ. फुखोंग चैवत,दुबई येथील सेहगल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे चेअरमन डॉ. सुरेशकुमार मधुसूदनन, टोरंटो- कॅनडा येथील डॉ. मनोज जैन यांनी जागतिक बाजारपेठेतील विक्री व्यवस्थापन सेवा व्यवस्थापन,आंतरराष्ट्रीय कायदे आणि उत्पादन,विक्री व सेवा उद्योगासमोरील आव्हाने उपाय योजनांवर आपली मते मांडली. हिमालयीन युनिव्हर्सिटी अरुणाचल येथील उपकुलगुरू डॉ. प्रकाश दिवाकरण आणि निलया ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, पुणे येथील सीए निलय मेहता यांनी शैक्षणिक संस्था पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आव्हाने व उपाययोजनांवर भाष्य केले. गोवा विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य आणि गव्हर्मेंट कॉलेजचे प्राचार्य डॉ. फिलिप रॉड्रिक्स, नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे येथील प्राचार्या डॉ. वैशाली रणधीर यांनी जागतिक वाणिज्य व व्यवस्थापन आणि उच्च शिक्षणाची कामगिरी विशद केली. ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड इंटरनॅशनल एग्रीकल्चर या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेती व शेती व्यवसायातील वापर आणि आंतरराष्ट्रीय शेती व्यवसायासमोरील आव्हाने व उपाय योजना यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.मुंबई येथील आंतरराष्ट्रीय क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट रंजिता पवार- जव्हेरी यांनी ताण-तणाव्यवस्थापन, आरोग्य, कौटुंबिक स्वास्थ्य आणि मनुष्याच्या मनाचे नियंत्रण व व्यवस्थापनावर प्रकाश टाकला. कावेरी कॉलेज पुणे येथील मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आणि प्रसिद्ध मनुष्यबळ व्यवस्थापन तज्ञ प्रा. डॉ. श्वेता बापट यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवसाय,शैक्षणिक संस्था आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मनुष्यबळ व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. गुवाहाटी कॉमर्स कॉलेज,गुवाहाटी येथील प्रा. डॉ. गौर गोपाल बनिक यांनी जागतिक देश आणि विकसित भारत या विषयावर विवेचन केले.


मुंबई येथील मोटिवेशनल स्पीकर आणि ऍक्टर डॉ. फिरदोस श्रॉफ, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी नवी मुंबई येथील वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या डीन डॉ. हर्षा गोयल यांनी मोटिवेशन आणि करिअर,नेतृत्व कौशल्य यावर आपले मत मांडले.
सिनर्जी लाइफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेड मुंबई येथील चीफ फिनान्शियल ऑफिसर सीए डॉ. मोतीलाल भावनानी यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योगांचे वित्तव्यवस्थापन याबरोबरच कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनावर भाष्य केले. सी.एस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कूनकोलीम गोवा येथील प्राचार्य डॉ. ए. व्ही.रायकर यांनी उद्योग व्यवसाय आणि संज्ञापन कौशल्य आणि शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन यावर संबोधन केले.
सदर आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिल मेहेर,उपाध्यक्ष सुजित खैरे,उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी,कार्यवाह रवींद्र पारगावकर, ग्रामोन्नती मंडळाचे संचालक अरविंद मेहेर व प्राचार्य डॉ. ए.बी.कुलकर्णी यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन संशोधन केंद्राचे प्रमुख प्राध्यापक डॉ. जे पी भोसले, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. डी. टाकळकर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अनुराधा घुमटकर, डॉ. विनोद पाटे, डॉ. आबा जगदाळे,डॉ.मधुरा काळभोर, डॉ. वैशाली मोढवे, डॉ. सारिका जगदाळे प्रा. पूनम आवटे, प्रा. सविता खरात,प्रा. तनुजा वाघ,प्रा. निलेश गावडे,प्रा. वैभव शिंदे प्रा. पूजा वाव्हळ,प्रा. गजानन जगताप, प्रा. डॉ.एस.एम फुलसुंदर, प्रा.आकाश कांबळे प्रा. जी.बी होले,प्रा. अक्षय भोर, प्रा.अक्षय वाजगे,प्रा.राजेंद्र महानवर,प्रा.समीर शेख, प्रा. सुप्रिया निंबाळकर,प्रा. अंकुश पिंगळे,प्रा. वैशाली वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *