सव्वालाख रू. किंमतीचे, 650 कीलो गोमांस, वाहतुक करणार्‍या वाहनासह, दोघेजण पोलिसांनी घेतले ताब्यात

रविंद्र खुडे
विभागीय संपादक 
२३ सप्टेंबर २०२२

शिरुर


दि. 23/09/2022 रोजी पहाटे 04.30 वा. चे सुमारास, मौजे शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे गावच्या हद्दीत सतरा कमान बायपास येथे, इसम नामे 1) शाहरुख इसुफ खान, वय 29 वर्षे, गोविंदपुरा, मुकुंद नगर, अहमदनगर. 2) समीर अब्दुलगणी शेख, वय 21 वर्षे, रा. अहमदनगर, हे काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ, नं. MH12 EX 7158 यामध्ये सुमारे 650 किलो वजनाचे गोमांस, अंदाजे किंमत रुपये 1,30,000 विक्री करण्यासाठी, पुणे वरुन नगर कडे जात आहेत, असे कंट्रोल विभाग पुणे ग्रामीण यांनी कळविल्यानंतर, तात्काळ शिरुर चे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी 17 कमान पुल, शिरूर येथे नाकाबंदी केली. संशयित स्कॉर्पिओ ला अडवून तिची तपासणी केली असता, त्यात सुमारे 650 कीलो वजनाचे गोमांस आढळून आले, की ज्याची किम्मत सुमारे सव्वा लाख रुपये आहे. हे गोमांस वाहून नेणारे दोन इसम वाहनासह ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अशोक भगवान चितारे यांनी कायदेशीर फिर्याद दिली आहे.

सदरची कारवाई ही शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार विनोद काळे, पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, पोलीस अंमलदार राजू मांगडे यांनी केली असून, सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *