मुलांच्या शिक्षणासाठी, कष्टकऱ्यांच्या मानवाधिकारासाठी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा 

दि. १७/०१/२०२३

रोहित खर्गे : विभागीय संपादक

थेरगाव

थेरगाव : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिचंवड शहरातील थेरगाव पवारनगर , १६ नंबर , पोलीस लाईन रोड , भाजीमंडई समोरील अण्णाभाऊ साठेनगर -२ या झोपड्पट्टीवरील अतिक्रमण कारवाई रद्द करण्यात यावी या मागणीसाठी अपना वतन संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक १६ जाने २०२३ रोजी दुपारी पिंपरी चिचंवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालय आकुर्डी येथे धडक मोर्चा काढण्यात आला.

मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. यावेळी प्राधिकरणच्या चुकीच्या कारभाराविरोधात घोषणा देण्यात आल्या . आम्हाला शाळा शिकू द्या , आम्हाला बेघर करू नका अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. मोर्चाला संबोधित करताना अपना वतनचे सिद्दीकभाई शेख यांनी म्हंटले आहे कि, कावेरीनगर भाजीमंडई समोरील अण्णाभाऊ साठेनगर – २ ही झोपडपट्टी मागील १० ते १२ वर्षांपासून आहे . याठिकाणी जवळपास ८० कुटुंबे आहेत . येथील सर्व नागरिक मागासवर्गीय ,भटक्या विमुक्त , आर्थिक दृष्ट्या दर्बल ,वंचित घटकातील आहेत . यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक , महिला ,लहान मुले यांचा समावेश आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून हे नागरीक याठिकाणी येऊन स्थायिक झालेले आहेत . दिवसभर कामानिमित्त इतरत्र भटकून कसे बसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात . त्यातील अनेकांची मुले जवळच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत केंद्र व राज्यसरकार सर्वाना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. अशा परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठेनगर २ मधील जवळपास ३८ मुले जवळच्या नागू गतिराम बारणे या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे कारवाई झाल्यास येथील नागरिक बेघर होणार आहेत . त्यावेळी या सर्व मुलांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्क हिरावून घेतल्यासारखे होईल. त्यामुळे थंडीचा व मुलांच्या शिक्षणाचा विचार करता मुलांच्या परीक्षा पूर्ण होईपर्यंत या सर्वांचा माणुसकीच्या दृष्टिकोनातून सहानुभूतीपूर्वक विचार करून अण्णाभाऊ साठेनगर येथील झोपडपट्टी धारकांवरील कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात यावी . यावेळी पिंपरी चिचंवड नवनगर विकास प्राधिकरण चे राहुल महिवाल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले व त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

या मोर्चाला नागरी हक्क कृती समितीचे मानव  कांबळे , कष्टकरी महासंघाचे काशिनाथ नखाते , छावा मराठा युवा महासंघ चे धनाजी येळकर पाटील , नॅशनल ब्लॅक पँथरच्या संगीता शहा यांनी पाठिंबा दिला . यावेळी अपना वतनचे सहसचिव राजू शेरे , संघटनेच्या महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा , प्रकाश पाठारे , फारुख शेख , गणेश जगताप , विशाल निर्मल यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *