वृत्तपत्र संपादकांची पहिली गोलमेज परिषद 24 सप्टेंबर रोजी औरंगाबादला

औरंगाबादसह अहमदनगर, जालना जिल्ह्यातील संपादक उपस्थित राहणार-प्रा.डॉ.प्रभू गोरे

बीड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई औरंगाबाद विभागाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि. 24 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता औरंगाबाद येथे वृत्तपत्र संपादकांची राज्यातील पहिली गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. औरंगाबादसह अहमदनगर आणि जालना जिल्ह्यातील संपादक या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. कोरोना संकटाने वृत्तपत्र क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणीवर चर्चा करुन भविष्याचा वेध घेण्यासाठी या परिषदेतून महत्वपूर्ण भूमिका ठरेल. त्यामुळे संपादकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परिषदेचे निमंत्रक तथा पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रभू गोरे यांनी दिली.

महाराष्ट्रात कोरोनांच्या संकटाचा सर्वाधिक फटका वृत्तपत्र क्षेत्राला बसला आहे. विभाग, जिल्हा स्तरावरची वृत्तपत्रे मोठ्या संख्येने आर्थिक अडचणीत सापडली आहेत. या वृत्तपत्र सृष्टीला सक्षमपणे उभा राहण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्नांची आवश्यकता असल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या औरंगाबाद विभागाच्या वतीने राज्यातील पहिल्या संपादकांच्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माध्यमांचे अर्थकारण आणि वेध भविष्याचा’ या विषयावर परिषदेत चर्चा होणार असल्याने यातून संकटात सापडलेल्या माध्यम क्षेत्राला पूर्वपदावर येण्यासाठी नवी उभारी मिळेल. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे हे मागील दोन महिन्यांपासून राज्यभरातील पत्रकार, संपादक , मालकांबरोबर चर्चा करुन माध्यमांच्या अर्थकारणाला उभारी देण्याची भूमिका मांडत आहेत. राज्यातील शंभरपेक्षा अधिक दैनिकांनी त्यांची भूमिका प्रसिद्ध करुन समर्थन दिले. तर त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. हाच धागा पकडून पत्रकार संघाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालय, अचल अपार्टमेंट, गजानन महारज चौक, गारखेडा परिसर औरंगाबाद येथे गुरुवार दि. 24 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 3 वाजता राज्यातील पहिली संपादकांची गोलमेज परिषद आयोजित केली आहे. औरंगाबादसह अहमदनगर आणि जालना जिल्ह्यातील संपादक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पहिल्यांदा होणार्‍या परिषदेला संपादकांनी उपस्थित रहावे असे आवाहन औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष आणि परिषदेचे निमंत्रक प्रा.डॉ.प्रभू गोरे यांनी केले आहे.

या परिषदेच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्‍वास आरोटे, राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत, जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते, शहर जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत झुरंगे यांच्यासह औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष ê