स्पर्श मेडिकल असोसिएशनच्या नवनियुक्त कार्यकारीणीचा पदग्रहण समारंभ शिक्रापूर येथे संपन्न अध्यक्षपदी डॉ राजेंद्र हार्दे यांची, तर डॉ प्रशांत कापरे यांची उपाध्यक्ष पदी निवड

स्पर्श मेडिकल असोसिएशनच्या नवनियुक्त कार्यकारीणीचा पदग्रहण समारंभ शिक्रापूर येथे संपन्न अध्यक्षपदी डॉ राजेंद्र हार्दे यांची, तर डॉ प्रशांत कापरे यांची उपाध्यक्ष पदी निवड
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. २०/०३/२०२४.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील स्पर्श मेडिकल असोसिएशनच्या नवनियुक्त कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ, कोकण कन्या ॲग्री टुरिझम, मुखई येथे रविवार दि. १७ मार्च २०२४ रोजी मोठ्या उत्सहात संपन्न झाला.
यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. स्पर्श मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ राजेंद्र हार्दे यांची, तर डॉ प्रशांत कापरे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. डॉ योगेश झुरुंगे यांची खाजिनदार पदी, तर डॉ प्रितम दरवडे यांची सचिव पदी निवड करण्यात आली आहे.
इतर कार्यकारिणी सदस्य पुढील प्रमाणे :-
डॉ यशवंत पंधरकर, डॉ जयश्री कावरखे पाटील, डॉ बापू दरेकर, डॉ सोमनाथ गव्हाणे, डॉ विकास भुजबळ, डॉ प्रतिभा निकम, डॉ सरिता व्यवहारे, डॉ सुमन वाव्हळ, डॉ प्रतिभा ताठे.
या समारंभासाठी पेरणे फाटा, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, तळेगाव, रांजणगाव, चौफूला येथील अनेक डॉक्टर मंडळी उपास्थित होते.
नव्याने सुरु झालेल्या या असोसिएशनचे एकूण १२० डॉक्टर्स सदस्य आहेत. तसेच असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. के बी सोनवणे, डॉ राम पोटे, डॉ अविनाश रुके, डॉ हेमंत वाघोलीकर, डॉ चंद्रकांत केदारी, डॉ श्रीकांत साकोरे, डॉ विशाल व्यवहारे, डॉ धनंजय लोंढे, डॉ संदीप वाव्हळ, डॉ मच्छिन्द्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रितम दरवडे यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ जयश्री पाटील यांनी केले व आभार डॉ प्रतिभा ताठे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *