कर्तृत्ववान महिलांच्या व्यक्तिरेखा सादर करून महिला दिन साजरा

नारायणगाव (किरण वाजगे,कार्यकारी संपादक) नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्ताने १९ मार्च २०२४ रोजी अनोखा उपक्रम प्राध्यापिकांद्वारे सादर करण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापिकांनी कर्तृत्ववान महिलांच्या व्यक्तिरेखा सादरीकरण ” साकार करून महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. हा उपक्रम प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार सादर करण्यात आली.

 


या कार्यक्रमात प्रमुख भूमिका संत मुक्ताबाई -प्रा.निकिता कुऱ्हाडे ,संत जनाबाई वृषाली सोलाट, राजमाता जिजाऊ डॉ. मंगल डोंगरे ,अहिल्याबाई होळकर- प्रा.कविता सोनवणे ,झाशीची राणी- प्रा.अश्विनी दिवटे ,सावित्रीबाई फुले- प्रा.अपर्णा ढेपे , आनंदीबाई जोशी -प्रा. प्रतिभा मोहिते , बहिणाबाई चौधरी – भाग्यश्री डेरे, सिमॉन -प्रा. पूजा वाव्हळ ,मधुबाला- प्रा. सुप्रिया निंबारकर ,लता मंगेशकर -तनुजा वाघ ,सिंधुताई सपकाळ -डॉ.वैशाली मोढवे ,निरजा भानोत – प्रा.पुनम आवटे ,स्मृती इराणी -डॉ.मधुरा काळभोर, प्रतिभाताई पाटील- डॉ.अनुराधा घुमटकर ,किरण बेदी -प्रा.अश्विनी गायकवाड ,रिंकू राजगुरू- डॉ. सारिका जगदाळे , सुधा मूर्ती – प्रा. सोनाली कदम, मलाला -प्रा. शेख इत्यादी व्यक्तिरेखांचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. जी. बी. होले, डॉ. काळे, डॉ. शिवणे, डॉ. लहू गायकवाड, डॉ. भोसले , डॉ. फुलसुंदर ,डॉ. काफले उपस्थित होते.
प्रा. वैशाली वाघ, प्रा. सोनल काकडे ,आशा खैरे, प्रा. ठाकरे, प्रा. कांबळे, डॉ. जगदाळे , योगेश खरमाळे, श्री. दिघे आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. मंगल डोंगरे यांनी निवेदन आणि सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. कविता सोनवणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *