येणेरे येथे सहजयोग परिवाराच्या वतीने ध्यान धारणा कार्यक्रम..

हरिनाम सप्ताहानिमित्त कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार सोहळा

नारायणगाव (किरण वाजगे,कार्यकारी संपादक) :- परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवाराच्या वतीने येणेरे (तालुका जुन्नर) येथे कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार तसेच ध्यान धारणेचे महत्त्व हा कार्यक्रम आज सकाळी उत्साहात आयोजित करण्यात आला.
येणेरे गावचे सरपंच अमोल भुजबळ व स्थानिक सहजयोगिनी हेमलता डोके यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. सहजयोग परिवार राजगुरुनगर विभागाच्या वतीने नारायणगाव,१४ नंबर, जुन्नर येथील सहजयोगी बंधू-भगिनी यावेळी उपस्थित होत्या. येथील श्री संत सावता माळी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी ध्यानधारणेचे महत्त्व तसेच कुंडलीनी जागृतीचे महत्व प्रात्यक्षिकासह जाणून घेतले. तसेच ध्यानधारणा केल्याने आपल्या जीवनात होणारा आमुलाग्र बदल याची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *