कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून योग्य नियोजन करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना

मंगेश शेळके – ओझर प्रतिनिधी
पुणे( ८ मे २०२१ )
कोरोणाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने सतर्क रहावे अशा सूचना देऊन या लाटेत लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करा. असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री अजित दादा पवार यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाय योजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट ,खासदार श्रीरंग बारणे ,पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ,पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे ,आमदार सुनील टिंगरे ,आमदार अशोक पवार ,आमदार संजय जगताप ,आमदार अतुल बेनके ,आमदार माधुरी मिसाळ ,आमदार मुक्ता टिळक ,आमदार सिद्धार्थ शिरोळे ,तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव ,यशदाचे महासंचालक एस चोकलिंगम ,भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी ,पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार ,पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील ,पी एम आर डी ए चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे ,जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश ,विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया ,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ,आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती ,प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना ,तसेच लसीकरण आधी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. पहिली लस घेतलेल्या नागरिकांना दुसरी लस उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.तसेच रेमडीसीवर बाबत गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करून दोषी रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी स्वतःहून नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे .ऑक्सिजनयुक्त व व्हेंटिलेटर युक्त उपलब्ध खाटा , उपलब्ध लस याविषयी समन्वय ठेवून नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवा असे आव्हानही अजित दादा पवार यांनी केले. कोरोना महामारी च्या संकट काळात गरजूंना अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वितरित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार सर्वश्री अशोक पवार ,सुनील टिंगरे ,अतुल बेनके, संजय जगताप ,मुक्ता टिळक ,माधुरी मिसाळ ,आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही यावेळी महत्त्वाचे विषय मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *