मराठा आरक्षणाचे लढवय्ये नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनामुळे हळहळले शिरूरकर : वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
१६ ऑगस्ट २०२२

शिरूर


मराठा आरक्षणासाठी रात्रीचा दिवस करणारे व सतत लढा देणारे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, यांचे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर रविवार दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजी अपघाती निधन झाले. हा अपघात इतका भीषण होता की त्यांच्या कारची एक बाजू व समोरील बाजू पूर्णपणे तुटलेली होती. पहाटेच्या ऐन झोपेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि क्षणार्धात त्यांचा प्राण गेला. ही बातमी काही क्षणात पसरताच अवघा महाराष्ट्र हळहळला.

विनायक मेटे
विनायक मेटे

शिरूर शहरातही विविध संघटना व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शीरुर नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीबाहेर आमदार विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व आठवणी व्यक्त केल्या. यावेळी प्रा सतीश धुमाळ, जनता दलाचे संजय बारवकर, आपचे अनिल डांगे, उद्योजक किरण पठारे, मनसेचे महिबूब सय्यद, माजी पं स सदस्य ह भ प कानिफनाथ वाखारे, जयवंत साळुंके, मराठा सेवा संघाचे संभाजी कर्डीले, ऍड रवींद्र खांडरे, बाबुराव पाचंगे, मोहन बोरकर सर आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी संतोष शितोळे, सागर नरवडे, योगेश महाजन, मुजफ्फर कुरेशी, अवि जाधव, हाफिज बागवान, राहील शेख, आबासाहेब जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *