सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रल्हाद वामनराव पै यांचे रविवारी पुण्यात व्याख्यान..

शिरूर
सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रल्हाद वामनराव पै यांचे रविवारी पुण्यात व्याख्यान
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. ०८/०२/२०२४.
थोर समाज सुधारक व तत्वज्ञ कै. सद्गुरू श्री वामनराव पै यांनी, सन १९५२ पासून “जीवनविद्या मिशन” अंतर्गत समाज प्रबोधन सुरू केले. ते स्वतः एक मोठे सनदी अधिकारी होते. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ खात्यात डेप्युटी सेक्रेटरी या पदावरून ते १९८१ साली निवृत्त झाले.
त्यांच्या “जीवनविद्या मिशन” अंतर्गत संस्कार शिक्षण अभियान, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, अवयव दान, ग्राहक संरक्षण, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व संवर्धन, ग्राम समृद्धी, विद्यार्थी मार्गदर्शन अभियान असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
त्यांच्या पछ्यात त्यांचे चिरंजीव श्री प्रल्हाद वामनराव पै हे जीवनविद्या मिशन चे संचालन करतात. त्यांचे शिक्षण B.Tech, IIT, Powai (Mumbai) येथे होवूनही त्यांनी आपल्या वडिलांचे समाजकार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्धार केला होता. आणि त्या पद्धतीने या संस्थे अंतर्गत समाज प्रबोधनाचे जगभर कार्य चालु आहे.


सद्गुरू श्री वामनराव पै यांची विश्वशांतीसाठी व विश्वकल्याणकारी विश्र्वप्रार्थना सर्वांनाच सुपरिचित आहे. ती म्हणजे –
“हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर, कल्याण कर रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम, मुखात अखंड राहू दे.”
समाज प्रबोधनाच्या याच पार्श्वभूमीवर, सद्गुरू वामनराव पै यांचे चिरंजीव श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन जीवनविद्या मिशन मार्फत, रविवार दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी, सायंकाळी ४.३० ते ८ या वेळेत, एस पी कॉलेज मैदान, टिळक रोड, पुणे या ठिकाणी करण्यात आले असून, विषय आहे “तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात.”
तरी या प्रबोधनात्मक व्याख्यानासाठी तमाम लोकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जीवनविद्या मिशन मार्फत करण्यात आलेले आहे.
याच पार्श्वभूमीवर शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूल, रयत शाळेत सौ संगीता पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मिशन च्या कार्याची माहिती देत, आपल्या जीवनात चांगल्या विचारांना व चांगल्या बैठकीला किती महत्त्वाचे स्थान असते हे अनेक उदाहरणांमधुन पटवून दिले. तसेच त्यासाठी पुणे येथे होणाऱ्या श्री प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रबोधनात्मक व महत्त्वाच्या व्याख्यानाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचेही आवाहन केले. मिशन मार्फत शिरूर येथून रविवारी पुणे या ठिकाणी या कार्यक्रमाला जाण्यासाठी मोफत बस सुविधा असुन, त्यासाठी पास देण्यात येणार असल्याने शिरूर केंद्राच्या संयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन केलेले आहे.
शिरूर येथील रयत शाळेत झालेल्या या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापक संजय मचाले, पर्यवेक्षक कृष्णा जगदाळे, निवृत्त रयत सेविका तसेच या मिशनच्या सदस्या सुरेखा शेळके मॅडम, आपला आवाज न्यूज नेटवर्क चे विभागीय संपादक रवींद्र खुडे, उपशिक्षक नवनाथ कळसकर, बाळासाहेब गिरीगोसावी, रमेश राजगूरे, संभाजी वाखारे, संजना कदम, सुनीता बनकर, नूतन पठारे, सविता शिंदे, अर्चना गावित्रे, कल्पना थोपटे आदी शिक्षक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *