कात्रज दूध संघाचा तारा निखळला

०६ डिसेंबर २०२२


कात्रज दूध संघाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक संजय अहिला कालेकर यांचे सोमवारी दि ५ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथे दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी त्यांचे गावी पिंपळवंडी (जुन्नर) येथे आज मंगळवार दि ६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई वडील, एक भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या परिवाराचा मुख्य आधारस्तंभ तेच होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळलय.

त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ आणि सर्वाना नेहमीच सोबत घेऊन जाणारा होता.प्रत्येकाला योग्य सल्ला देऊन सहकार्य करणे असा त्यांचा प्रयत्न असायचा.ते कार्यरत असताना त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला. शांत, संयमी, मनमिळाऊ व्यक्तिमत्व हरपल्याने कात्रज डेअरीतील सहकाऱ्यांमध्ये आणि त्यांच्या राहत्या गावी एकच शोककळा पसरली. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आपला आवाज न्युज नेटवर्क परिवाराच्या वतीने
संजय कालेकर
यांना
भावपूर्ण श्रद्धांजली


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *