शिरूर भाजपा च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त, न. पा. च्या शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न…

शिरूर भाजपा च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त, न. पा. च्या शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. ०३/०१/२०२४.

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त, शिरूर शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने, “बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ” अभियाना अंतर्गत, भाजपच्या जिल्हा सहसंयोजक अनघा पाठकजी यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरूर नगर परिषद शाळा क्र. ४ व शाळा क्र ६ मधील सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते, क्रांतिज्योती शिक्षण महर्षी सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन काही विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांची मनोगते झाली. यावेळी अनेक लहान चिमुरड्यांनी सावित्री बाईंची वेशभूषा परिधान केलेली होती.
कार्यक्रमासाठी भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक विनोद भालेराव, ‘मन की बात’ अभियानाचे तालुकाध्यक्ष विजय नरके, तसेच “बेटी बाचाओ, बेटी पढाओ” अभियानाच्या शहर संयोजक भारती शहाणे, सह संयोजक वर्षा मालेवार, शहर कार्यालय मंत्री भारत शहाणे, ॲड. कोमल बोरा, सा. कार्यकर्त्या वैशाली चव्हाण, सहकार्यालय मंत्री पद्मराज कोळपकर, दीव्यांग संघटनेचे सा. कार्यकर्ते सागर सारंगधर, सह संयोजक नयना परदेशी व वर्षा परदेशी, सदस्य कविता परदेशी, मंडल प्रमुख अरुणा परदेशी, शिरूर शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष हुसेन शाह आदी पदाधिकारी उपस्थित होते.


या आरोग्य तपासणीसाठी डॉ. अभिषेक लुणावत, डॉ. उमा चांडक व त्यांच्या सर्व टीमचे अमूल्य असे सहकार्य लाभल्याचे, आरोग्य शिबिराच्या आयोजकांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कला माहिती देताना सांगितले.
यावेळी नगर परिषद शाळा क्र. ४ च्या मुख्याध्यापिका अलका साळवे, शाळा क्र. ६ चे मुख्याध्यापक संजय वाघ, तसेच अनिता धुमाळ, अशोक मानमोडे, छाया मानमोडे, प्रीती चव्हाण, सुनीता पवार, लीला झांबरे, अर्चना गुळवे, बाळासाहेब निर्वळ आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *