नारायणगाव येथे कृषी विद्यार्थ्याची शेती विषयक प्रात्यक्षिके…

 

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषी विद्यार्थी तेजस ज्ञानेश्वर खराडे यांनी ग्रामीण कृषी जागरुकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१ – २०२२ चा अभ्यासाअंतर्गत येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक माहिती व शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले.
कोरोना परिस्थिती ग्राह्य धरता सर्व कृषी विद्यार्थी आपल्या घरूनच (आपल्याला सोईस्कर होईल अशा ठिकाणाहून) ग्रामीण कृषी जागरुकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम पार पाडत आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम ऑनलाईन व घर टू घर अशा वेगळ्या पद्धतीने राबविण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांचा शेतीविषयक अनुभव जाणून घेऊन त्यांना आधुनिक व शास्त्रीय शेतीची माहिती देण्यात आली.माती परीक्षणाचे महत्व, आधुनिक तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, पिकांवर आवश्यक असणारी सेंद्रिय खते, औषधे यांचा योग्य वापर कसा करावा आदी विषयांवर यावेळी चर्चासत्र व प्रात्यक्षिके घेण्यात आली. महिलांनी घरच्या घरी खाद्यपदार्थ तयार करून त्याची साठवणूक कशी करावी तसेच त्याचे जीवनमान जास्त प्रमाणात कसे वाढवावे याबाबत सविस्तर माहिती देऊन सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर यु. बी. होले, कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे केंद्रप्रमुख डॉक्टर आर. एच. शिंदे, समन्वयक डॉक्टर बी. टी.कोलगणे (कृषी विस्तार आणि संवाद प्राध्यापक रा.छ. शा. म. कृषी महाविद्यालय, कोल्हापूर) आणि कार्यक्रम अधिकारी डॉक्टर एम. एस. मोठे मॅडम (कृषी वनस्पतीशास्त्र सहाय्यक प्राध्यापिका रा.छ.शा.म. कृषी महाविद्यालय कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमास सदाशिव खंडू तांबे, आशा तांबे, मारुती विधाटे, अर्चना विधाटे,शशिकांत कोल्हे, कृष्णा खराडे, खंडू विधाटे, मंगल विधाटे आदि शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक निराकरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *