अखिल भारतीय मराठा महासंघ आंबेगाव तालुका पत्रकार परिषद शनिवार, दिनांक ०२.१०.२०२१ रोजी मंचर येथे पार पडली.

सदानंद शेवाळे
बातमी प्रतिनिधी
०३ ऑक्टोबर २०२१

मंचर

परिषदे मध्ये नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्ती घोषित केल्या तसेच पुढील वाटचाल साठी दिशा ठरविण्यात आली.

या वेळेस श्री अंकुशभाऊ लांडे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष यांनी नवीन कार्यकरणीला मार्गदर्शन केले त्यात त्यांनी मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधताना तालुक्यातील तळागाळातील युवकांना बरोबर घेऊन नवउद्योजक घडवताना तालुक्याचा विकास झाला पाहिजे ह्यावर भर दिला.

यावेळेस श्री सोमनाथ हुले आंबेगाव तालुका अध्यक्ष यांनी सर्वसामान्य मराठा समाजाला सर्वांना बरोबर घेऊन संघटना मजबूत करण्यासाठी गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे उद्योजक निर्माण करण्यासाठी श्री अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच सारथी योजनेचा लाभ हा हुशार आणि कष्टाळू असलेल्या पण आर्थिक गरीब मराठा युवकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

तसेच सौ. मनिषा गावडे आंबेगाव तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा यांनी महिला सक्षमीकरण करणार असल्याचे सांगताना नवीन युवतींना उद्योजकता पर मार्गदर्शन मेळावा घेणार असल्याचे सांगितले तसेच महाविद्यालयिन विद्यार्थिनींसाठी शासकीय भरती प्रक्रिया मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले.

नवीन कार्यकारणी खालीलप्रमाणे

अखिल भारतीय मराठा महासंघ पुरुष कार्यकारणी
श्री सोमनाथ हुले-अध्यक्ष
श्री तुषार तोत्रे-उपाध्यक्ष
श्री गणेश खानदेशे-उपाध्यक्ष
श्री अनिल पडवळ-उपाध्यक्ष
श्री योगेश हुले-सरचिटणीस
श्री विशाल कराळे-सहचिटणीस
श्री रविंद्र वर्पे-कोषाध्यक्ष
श्री नवनाथ शिंदे-सहकोषाध्यक्ष
श्री संतोष मशेरे-संघटक
श्री सुरेश निघोट-प्रसिद्धिप्रमुख
श्री बाळासाहेब गव्हाणे-संपर्कप्रमुख
श्री अजय घुले-शासकीय योजना मार्गदर्शन
श्री वसंत बाणखेले-शासकीय योजना मार्गदर्शन
श्री विलास हुले-सल्लागार

अखिल भारतीय मराठा महासंघ आंबेगाव तालुका महिला आघाडी

सौ मनिषा गावडे-अध्यक्ष
सौ रूपा शेवाळे-कार्याध्यक्ष
सौ मालती थोरात-उपाध्यक्ष
सौ निलम टेमगिरे-उपाध्यक्ष
सौ अरुणा टेके-सरचिटणीस
सौ रोहिणी अजाब-सहचिटणीस
सौ संगिता बाणखेले-कोषाध्यक्ष
सौ सुमन थोरात-सहकोषाध्यक्ष
सौ लता मेंगडे-संघटक

अखिल भारतीय मराठा महासंघ पुरुष युवक कार्यकारणी

श्री आशिष घोलप-अध्यक्ष
श्री शिवाजी पवळे-कार्याध्यक्ष
श्री दत्तात्रय खिल्लारी-उपाध्यक्ष
श्री सुभाष निघोट-उपाध्यक्ष
श्री निलेश शेळके-सरचिटणीस
श्री विशाल ढमाले-सहचिटणीस
श्री कार्तिक काळे-कोषाध्यक्ष
श्री अनिल वाजे-सहकोषाध्यक्ष
श्री विशाल शिंदे-संघटक
श्री वैभव काळे-प्रसिद्धिप्रामुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *