श्रीराम मांसाहारी होते या जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा शिरूर भाजपच्या वतीने निषेध…

श्रीराम मांसाहारी होते या जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा शिरूर भाजपच्या वतीने निषेध
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. ०४/०१/२०२४.

शिरूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी, शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना, प्रभू श्रीराम यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, त्याच्या निषेधार्थ शिरूर तालुक्यातील शिक्रापूर – चाकण चौकात, गुरुवार दि. ०४/०१/२०२४ रोजी, भाजपचे शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.
सोनवणे यांनी पुढे असेही सांगितले की, काल बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड, यांनी हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या बद्दल जे बुद्धिभेद करणारे वक्तव्य केले, त्याच्या निषेधार्थ शिक्रापूर येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणा देत व आव्हाड यांची प्रतिमा असलेले छायाचित्र जाळून निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनालाही अव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन शिरूर भाजप च्या वतीने करण्यात आलेय. गुन्हा दाखल न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असेही यावेळी भाजपच्या वतीने सांगण्यात आलेय.


यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, किसान मोर्चा प्रदेश सचिव जयेश शिंदे, भाजपा ज्येष्ठ नेते बाळासाहेब चव्हाण, भाजपा उद्योग आघाडी अध्यक्ष राजाभाऊ मांढरे, कामगार मोर्चा अध्यक्ष विद्याकाका दरेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
या निषेध कार्यक्रमासाठी अशोक हरगुडे, बजरंग दलाचे अध्यक्ष महेश चव्हाण, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष सुरज चव्हाण, युवा मोर्चा अध्यक्ष रोहित खैरे, तालुका सरचिटणीस केशव पाचर्णे, संतोष करपे, शिरूर हवेली विधानसभा विस्तारक रघुनंदन गवारे, भाजपा नेते पंढाभाऊ गायकवाड, भाजपा जिल्हा सचिव भाग्यश्री गायकवाड, ओबीसी महिला मोर्चा पल्लवी हिरवे, भाजपा चिटणीस सुनीता जाधव, युवा वॉरिअर अध्यक्ष वैभव गवारे, विद्याधर दरेकर, पदवीधर आघाडी अध्यक्ष कमलेश कुलकर्णी, दिव्यांक आघाडी अध्यक्ष गोरक्ष कुंभार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
या निषेध कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उद्योग आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ मांढरे यांनी केले. तर आभार युवा मोर्चा अध्यक्ष रोहित खैरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *