वडगाव रासाई – मांडवगण फराटा जि प गटातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस आय पक्षात जाहीर प्रवेश…

वडगाव रासाई – मांडवगण फराटा जि प गटातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस आय पक्षात जाहीर प्रवेश

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. ०३/०१/२०२४.

तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या मीटिंगमध्ये, कांग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमढेरे यांच्या पुढाकारातून, वडगाव रासाई – मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटातील २५ ते ३० जणांनी काँग्रेस आय पक्षात, बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ रोजी प्रवेश केलाय. त्यामुळे जशा निववडणुका जवळ येऊ लागल्यात, तशा राजकीय घडामोडी घडू लागल्याचे चित्र शिरूर तालुक्यात दिसून येत आहे.
यावेळी नव्यानेच प्रवेश झालेले शेखर खोमणे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की, “आगामी काळात महेशबापू ढमढेरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष शिरूर तालुक्यात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करू.”
यावेळी उत्तर देताना ढमढेरे म्हणाले की, “काँग्रेस आय पक्षाला देशात एक उज्वल अशी ऐतिहासिक परंपरा असून, पक्षाच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय दिला जातो. त्यामुळे नव्यानेच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देण्यात येईल, तसेच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कार्याला सर्वतोपरी पाठबळ देण्यात येईल.”
तळेगाव ढमढेरे येथे झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, काँग्रेस आय चे शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव होते. त्यांनी मनोगतात बोलताना सर्व नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका उपाध्यक्ष डॉक्टर सुजित शेलार, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सचिन पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनीही मनोगत व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शेखरदादा खोमणे युवा मंचच्या सर्वच सदस्यांनी, खोमणे यांच्यासह काँग्रेस आय पक्षात प्रवेश केला. त्यात वैभव आरडे, साहिल सय्यद, मयूर काळे, दत्ता खोमणे, श्रीकांत लांडगे, ऋतुराज समिंदर, ऋषिकेश भोसले, यश डोळस, आदित्य खोमणे, तेजस भंडलकर, पियुष चव्हाण, अशोक घोडके, ऋषिकेश गायकवाड, शेखर लांडगे, गणेश भंडलकर, आकाश भोसले, सुरेश सोनवणे, आकाश खोमणे, अनिकेत खोमणे, श्रीकांत खोमणे, नवनाथ गायकवाड, संदीप भालेराव, ओम भालेराव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याची माहिती ढमढेरे यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *