४० चोरांचे २५ घोटाळे बाहेर काढणार – संजय राऊत

२८ डिसेंबर २०२२


महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट मंत्री भ्रष्टाचारासाठी चाललेलं हे सरकार आहे आणि या ४० मंत्री आणि आमदारांचे २५ भ्रष्टाचाराचे प्रकरण आमच्याकडे आहेत, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

महाराष्ट्रात भविष्यात राजकीय परिवर्तन, क्रांती मोठ्या प्रमाणात होणार आहे. या संदर्भातील पाऊल पडत आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यातील अनेक राजकीय आणि सामाजिक घटक हे जवळ येत आहेत. एकत्र काम करून महाराष्ट्रात आणि देशात काम करण्यासंदर्भात आमच्यात एक मत आहे.

काही लोक म्हणतात बॉम्ब कधी फुटतात, ही सुरुवात आहे. हे टोकन आहे. संजय राठोड यांच्या दोन जमिनीचे प्रकरण, अब्दुल सत्तार यांचे कलेक्शन, कृषी कर्मचाऱ्यांना पकडून कोट्यावधी रुपये जमा केले जात आहे. ३६ एकर गायरान जमीन ज्या पद्धतीने रेवडी सारखी वाटली. या क्षणी या आमच्याकडे २५ प्रकरण पडली आहेत. पण, आमच्यासाठी सीमा प्रश्न ठराव महत्त्वाचा होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की सीमा प्रश्नाचा ठराव होत असताना इतर प्रकरण घेऊ नये.

मी आजच्या हा भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन चालणं भारतीय जनता पक्षाला जड होत आहे. कारण भारतीय जनता पक्ष यांची बदनामी होत आहे. महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट मंत्री भ्रष्टाचारासाठी चाललेलं हे सरकार आहे आणि हे सर्व लोक अलिबाबा ४० चोर यामध्ये आहेत आणि हळूहळू चाळीस मंत्री आणि आमदार यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे येतील.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *