तळेगाव ढमढेरेच्या गुजर प्रशालेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : ०४/०१/२०२४.

तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जी. पुणे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, त्याचप्रमाणे काँग्रेस आय चे तालुकाध्यक्ष वैभव यादव, तालुका उपाध्यक्ष डॉ. सुजित शेलार, युवा नेते शेखर खोमणे, दादा आरगडे, दत्ता खोमणे, तसेच संजय गांधी निराधार योजना शिरूरचे सदस्य सचिन पंडित यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी होत असताना विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल मार्गदर्शन करताना, महिलांनी त्या घेत असलेल्या शिक्षणाचा सदुपयोग समाजासाठी कसा करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तर डॉक्टर सुजित शेलार यांनीही सावित्रीबाई फुले यांच्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


प्रशालेची विद्यार्थिनी तनवी खांडे, आराध्या लोखंडे व समीक्षा भुजबळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रशालेच्या उपशिक्षिका वैशाली गरुड यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा सखोल आढावा घेतला.
विशेष म्हणजे म. ज्योतीराव फुले यांनी स्वतः ज्या १८ शाळा सुरू केल्या होत्या, त्यात तळेगाव ढमढेरे येथील एका शाळेचा समावेश असल्याचे सर्वांनीच आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कुंडलिक कदम यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे त्याचप्रमाणे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कुंडलिक कदम यांनी केले, तर आभार प्रा गुरुनाथ पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *