भैरवनाथ वि.का. सेवा सहकारी सोसायटी सविंदणेच्या चेअरमनपदी पत्रकार अरूणकुमार मोटे, व्हा. चेअरमनपदी हरीभाऊ पवार

भैरवनाथ वि.का. सेवा सहकारी सोसायटी सविंदणेच्या चेअरमनपदी पत्रकार अरूणकुमार मोटे, व्हा. चेअरमनपदी हरीभाऊ पवार

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : 04/01/2024.
सविंदणे ता. शिरूर येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी, पत्रकार अरूणकुमार ज्ञानेश्वर मोटे तर व्हाईस चेअरमनपदी हरीभाऊ नाना पवार यांची बिनविरोध निवड झालीय. सोसायटीचे चेअरमन संभाजी पडवळ व व्हा. चेअरमन जनाबाई किसन पडवळ यांनी राजीनामा दिल्याने, भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यालयात चेअरमन, व्हा. चेअरमनपदाची निवड मंगळवार दि. ०२ जानेवारी २०२४ रोजी, सहाय्यक निंबधक अरुण साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लिपिक (सरकारी संस्था) धायगुडे ए. एस; सचिव रघुनाथ गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने बिनविरोध निवडी झाल्या.
याप्रसंगी माजी सरपंच वसंत पडवळ, रा. कॉ. युवक अध्यक्ष बाळासाहेब भोर, संचालक रामदास पडवळ, संभाजी पडवळ, कैलास किठे, हरीभाऊ पवार, निलेश मिंडे, माणिक नरवडे, भाऊसाहेब पडवळ, बाळासाहेब पडवळ, बाळासो लंघे, नवनाथ लंघे, शोभा लंघे, सरपंच शुभांगी पडवळ, ऊपसरंपच नंदा पुंडे, माजी उपसरंपच भाऊसाहेब लंघे, भोलेनाथ पडवळ, ईश्वर पडवळ, फुलाजी लंघे, जितेश पवार, बाळू पवार, बाळासाहेब पडवळ, दगडू पडवळ, दत्तात्रय नरवडे, पोपट शिंदे, जयदिप लंघे, मयूर कोळेकर, गणेश कोळेकर, विकास गाजरे, वैभव शेलार, धोंडीभाऊ गावडे, जयकुमार मोटे, प्रकाश मेचे, महादू पोखरकर , फाकटे गावचे सरपंच शंकर पिंगळे, मनिष बोऱ्हाडे, बाबाजी बोऱ्हाडे, भिमाजी कांदळकर तसेच पंचक्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे, माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सह. सा. कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रदीपदादा वळसे पा., माजी पं. समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, टाकळी हाजीचे सरपंच दामु आण्णा घोडे, तसेच समस्त पत्रकार बांधव व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *