बी.डी. काळे महाविद्यालय येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा…

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी डी काळे महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवस्वराज्य दिन’ नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर यांचे शुभहस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी इतिहास विभागप्रमुख प्रा.डॉ. नाथा मोकाटे यांचे “शिवराज्याभिषेकाचे महत्त्व” या विषयावर झूम मंचावर आॕनलाईन व्याख्यान संपन्न झाले. अध्यक्षस्थानी  प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव हे होते.

याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.बी.एम.पवार  उपस्थित होते. सदर व्याख्यानाचा लाभ महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी घेतला. शासनाच्या व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  सूचनेनुसार सकाळी अकरा वाजता प्रा. नितीन बानगुडे यांच्या यूट्यूब लाइव्ह व्याख्यानाचा लाभ घेण्याबाबत सर्व उपस्थितांना सूचित करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.डॉ. वल्लभ करंदीकर यांनी केले.  आभार विद्यार्थी विकास  मंडळाचे प्रमुख डॉ.गुलाबराव पारखे यांनी मानले.