पिंपरी चिंचवड शहरातील मोशी मधे पार पडत आहे किसानचे भव्य अंतराष्ट्रीय कृषी प्रदर्शन…

प्रतिनिधी – प्रसन्न तरडे

13 डिसेंबर 2023 रोजी मोशी येथील इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटर या ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या किसानच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली.हे भव्य कृषी प्रदर्शन 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीमध्ये या ठिकाणी पार पडत आहे.विशेष म्हणजे हजारोहुन अधिक शेतीसाठी गरजेचे असणारे  आंतरराष्ट्रीय दर्जेच्या साहित्यांचे या ठिकाणी प्रदर्शन होत आहे.

हे कृषी प्रदर्शन भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असून यंदाच्या वर्षी हे 32 वे कृषी प्रदर्शन आहे.15 एकर प्रदर्शन क्षेत्रावर 450 सून अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्या त्याचबरोबर इतर संशोधन संस्था व शेतातील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने या ठिकाणी सादर करण्यात आले आहे.संपूर्ण देशभरातून लाखोंच्या संख्येने शेतकरी या ठिकाणी या प्रदर्शनास भेट देत आहेत.आधुनिक पद्धतीने कशा प्रकारे शेती करता येईल यासाठी अनेक कंपन्यांचे शेतीसाठी उपलब्ध असणारे साहित्यांचे या ठिकाणी प्रदर्शन होत आहे.या प्रदर्शनामध्ये कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांसाठी वेगवेगळ्या दालनाचे यामध्ये समावेश आहेत.

या प्रदर्शनात बियाण्यांपासून औद्योगिक शेती,वॉटर पंप,सोलर पंप,ट्रॅक्टर,मत्स्य शेती,पशुखाद्य पासून ते मोठमोठ्या यंत्रणांचा देखील समावेश आहे.या ठिकाणी प्लास्टिकअलवर आणि संरक्षक शेतीचे देखील वेगळे दालन असून सवलतीच्या दारात शेतीसाठी आवश्यक असलेल्या यंत्रणांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.या कृषी प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित कंपनी जसे किर्लोस्कर,महिंद्रा,केएसबी,फिनोक्स टेक्नोमॅक,नेपोटियन,विनोदराई,हीमीडिया,के.बी अशा अनेक कंपन्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *