राजू थोरात
तासगाव प्रतिनिधी
तासगाव तालुक्यातील नेहरूनगर येथे नंदीवाले समाज जास्त प्रमाणात राहावयास आहेत.नंदीवाले समाजातील प्रत्येकाला जातीच्या दाखल्यासाठी अडचन येत होते.काही लहान लहान मुले जातीच्या दाखल्यासाठी शिक्षणापासून वंचीत राहू लागली.तर काहीजन नोकरी पासून वंचीत राहू लागले.तर काही शिष्यवृत्तीपासून वंचित राहू लागली.
त्यानुसार नंदीवाले समाजाने प्रांत अधिकारी समीर शिंगटे व तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या कडे दाद मागितली.नंदीवाले समाजाला घेऊन नेहरूनगरचे सरपंच डॉ गणेश यादव,उपसरपंच पंडित पाटील,विजयकुमार कोळी,दीपक भोसले,सूर्यकांत भोसले,ह्या सर्वजनांनी प्रांत अधिकारी समिर शिंगटे, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या कडे दाद मागून जातीच्या दाखल्यासाठी आग्रह धरला.राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर पाटील यांनी पुढाकार घेऊन नेहरूनगर येथे काल कँप घेण्यास सांगितले त्यानुसार सर्कल शेटे,तलाठी बनसोडे, व सेतू कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीं सायंकाळी 5 वाजता कँप घेतला स्वता तहसीलदार कल्पना ढवळेही उपस्तीत होत्या.सदर कँप मध्ये अंदाजे 150 च्या वर जातीचे दाखले दिले.जातीचे दाखले देण्यासाठी रात्री 3 पर्यत गर्दी होती.ह्या पूर्वी असाच कँप स्व आर आर आबा असताना राबवला होता.
जातीचे दाखले मिळाल्या नंतर गोरगरीब नंदीवाले समाजाच्या मुलांच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहत होते.हे सर्व करत असताना
तासगावच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांनी मात्र जातीचे दाखले देण्यासाठी रात्र जागवली.