मानसिंगभैय्या पाचुंदकर यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधीलकीतून फ्रंट लाईन वर्कर्सना वाटले आरोग्य किट…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
रांजणगाव गणपती : दि. 03/05/2021.

      कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणारे आरोग्य सेवक व पत्रकार यांना, रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील राजमुद्रा उद्योग समुहाच्या वतीने, सामाजिक बांधिलकी जपत या सर्वांचे संरक्षण म्हणून एक छोटासा प्रयत्न म्हणजेच आरोग्य साहित्यकिट हे ऑक्सिमीटर सह देण्यात आले.  

        आंबेगाव – शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, यांनी आपल्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून, राजमुद्रा उद्योग समूह व मानसिंग पाचुंदकर मित्र परिवाराच्या वतीने, कोरोनाच्या काळात कोरोना योद्धे म्हणून कर्तव्य बजावणारे शिरुर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व कोविड सेंटर मधील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका आणि पत्रकार बंधू यांना संरक्षण म्हणून, आरोग्य साहित्य किट भेट दिले. या किटमध्ये ऑक्सिमीटर, एन ९५ मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवॉश, हॅन्डग्लोज व अर्सेनिक अल्बम गोळया यांचा समावेश होता. तसेच पाचुंदकर यांच्या वतीने, शिरूर तालुक्यातील कायम विनानुदानित माध्यमिक शाळांना आरोग्य सुरक्षा किट भेट देण्यात आले. रांजणगाव गणपती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर, यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल घोडेराव, डॉ. महेश सातव, राजमुद्रा उद्योग समूहाचे संचालक ज्ञानेश्वर पाचुंदकर, युवा उद्योजक सचिन दूंडे, कारेगावचे माजी उपसरपंच राजेंद्र नवले, भांबर्डेचे सरपंच दीपक वीर, युवा उद्योजक गणेश लांडे, अनिल दुंडे, युवा उद्योजक निलेश लांडे, मोहन शेळके, रांजणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास फंड, खंडाळेचे ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ नरवडे, विट्ठल नळकांडे, केंदुरचे ग्रामपंचायत सदस्य सुनिल थिटे, युवा उद्योजक राजेंद्र शेळके, युवा उद्योजक विजय खेडकर, शरद चौधरी आदि उपस्थित होते.
       दरम्यान पाचुंदकर यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून युवा उद्योजक निलेश लांडे, विजय खेडकर, मिलिंद गायकवाड, अतुल पाचुंकर, पाराजी पाचुंदकर यांच्या वतीने रांजणगाव एमआयडीसी व टाकळी हाजी येथील कोविड सेंटर येथे मास्क व सॅनिटायझर देण्यात आले.      

                                                                 मानसिंग पाचुंदकर यांनी गेल्या वर्षीच्या कोरोना काळात देखील, गरीब व गरजू व्यक्तींना एकूण २ð