पिंपरी चिंचवड :- भक्ती शक्ती शिवसृष्टीच्या जागेसाठी मारुती भापकर पुन्हा आक्रमक

भक्ती शक्ती शिल्पसमूहालगच्या जागेबाबत पीएमआरडीए प्रशासनाने पोलीस पोलीस बंदोबस्त घेऊन या जागेत रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला होता. ही जागा कायमस्वरूपी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे जयंती, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, समस्त ग्रामस्थ निगडी जत्रा उत्सव, १५ ऑगस्ट २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे करण्याकरता कायमस्वरूपी राखीव रहवी, या जागेत भव्य शिवसृष्टी, व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी गेल्या वर्षभर समिती व सर्व राजकीय सामाजिक संस्थांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने सुरू आहेत.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार आमदार यांना समितीच्या वतीने मागणी करण्यात आले आहे. मात्र पीएमआरडीए प्रशासन शासनाची दिशाभूल करून अत्यंत षडयंत्र पूर्वक हा भूखंड बिल्डरांच्या घशात घालू पाहत आहे. म्हणून आज या जागेवर जाऊन समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात मारुती भापकर, सचिन चिखले, अण्णा कसबे, रोहिदास शिवणेकर, डी पी खंडागळे,चंद्रकांत लोंढे, युवराज दाखले,सागर तापकीर,जीवन बोराडे, ज्ञानेश्वर मल शेट्टी आशाताई शहाणे शिवाजी साळवे, बालाजी कांबळे, बाळासाहेब गालफाडे, आबासाहेब मांढरे, ब्रह्मानंद जाधव, सुरेश भिसे, प्रकाश जाधव, सतीश काळे, वैभव जाधव, बालाजी साळवे, बालाजी गवारे, सचिन बोराडे, दिनेश दोराडे, महानंदा कसबे अक्षय उदमीटे आदि सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *