पिरंगुट येथील सेवक डोळस यांना पतसंस्थेच्या मार्फत रुपये २०००००/- ची आर्थिक मदत

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
१० जानेवारी २०२२

ओझर


आज पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मुख्यालयात मौजे पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयातील सेवक विशाल अशोक डोळस यांचे अल्पशा आजराने काही दिवसांपूर्वी दु:खद निधन झालेले आहे.त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयास “पुणे जिल्हा शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेमार्फत शारदाबाई पवार सहाय्यता मदत निधी” मधून रु.२०००००/-चा धनादेश संस्थेचे उपाध्यक्ष मा.राजेंद्र घाडगेसाहेब आणि उपसचिव मा.एल्.एम्.पवार सर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला त्याप्रसंगी पतसंस्थेचे संचालक सुधीर रंधवे, संजय कामठे,महेंद्र अवघडे सर, बाळासाहेब शितोळे, रवींद्र लाड आणि संचालक मंडळ सर्व उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *