आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
शिवसेना शिंदे गटाच्या घोडेगाव ता.आंबेगाव शिवसेना महिला आघाडी उपविभाग प्रमुखपदी कांचन काळोखे यांची माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
हिंदुहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख,बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्यनेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना सचिव संजय मोरे,शिवसेना जिल्हाप्रमुख शरददादा सोनवणे व आंबेगाव तालुकाप्रमुख संतोष डोके यांच्याशी विचार विनीमय करून घोडेगाव ग्रामपंचायत येथे, कार्यरत असलेली कार्यक्षम ग्रामपंचाय सदस्य सौ.कांचन सुदाम काळोखे गायकवाड यांची शिवसेना महिला आघाडी उपविभागप्रमुख (घोडेगाव पंचायत समिती गण )पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी घोडेगाव शिवसेना शहर प्रमुख आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तुकाराम काळे तसेच काळोखे कुंटूंबा सोबत शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी नियुक्ती पत्र दिले.व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.