शहरात जवानांना व वृक्षांना राखी बांधून तसेच सीमेवरील जवानांना ११,१११ राख्या पाठवून वैष्णवी फाउंडेशन तर्फे आगळे वेगळे रक्षाबंधन साजरे

चर्होली:-

रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.
या दिवसाचे औचित्य साधून वैष्णवी फाऊंडेशन तर्फे पिंपरी चिंचवड शहरामध्ये सदस्यांच्या हस्ते जवानांना आणि वृक्षांना राखी बांधून व सीमेवरील जवानांना ११,१११ राख्या पाठवून तसेच ज्या महिला भगिनींना भाऊ नाही किंवा कामानिमित्त ज्यांचा भाऊ परगावी आहे अशा महिला भगिनींना कडून वैष्णवी फाउंडेशनच्या सदस्यानी राख्या बांधून घेऊन रक्षाबंधन साजरे केले
त्यावेळी बोलताना सौ.पुनम तापकीर यांनी सांगितले की;आयुष्यभर आपल्या रक्षणासाठी सैनिक रात्रं दिवस आपले संरक्षण करून देशाची सेवा करतात व वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम करते तसेच भावाप्रमाणे आमचं रक्षण करतात,जीवनदान देतात
समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही आज वैष्णवी फाउंडेशन च्या माध्यमातून रक्षाबंधन साजरे करतोय…

कार्यक्रमाचे आयोजन वैष्णवी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री.अमित तापकीर पा, यांनी केले तसेच कार्यक्रमास श्री वाघेश्वर तापकीर पा., सामाजिक कार्यकर्त्या सौ. समिंद्रा तापकीर पा., सौ.पुनम तापकीर पा., प्रसिद्ध प्रवचनकार कीर्तनकार ह. भ. प. सौ. सविताताई काळजे, सौ कविताताई बुर्डे, सौ. सारिका पठारे,कु.काव्या तापकीर पा, सौ.साक्षी खैरे, कु वैष्णवी तापकीर पा., श्री.दत्तात्रय बुर्डे, श्री. अतुल पठारे, आशुतोष जोशी कैवल्य दादा तापकीर पा. श्री नवनाथ काळजे आणि फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *