मंचर ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे बुधवार (दि.२१) रोजी राबवल्या गेलेल्या कोरोना चाचणी ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला. कोरोना चाचणी संदर्भात ग्रामपंचायत प्रशासन गेले ८ दिवस नागरिकांना आवाहन करत होते तसेच दिनांक १९ व २० एप्रिल या दोन दिवशी सरपंच, उपसरपंच संबंधित वार्ड मधील ग्रामपंचायत सदस्य व सर्वपक्षीय नेते यांनी मंचर शहरातील प्रत्येक वार्ड मध्ये जाऊन नागरिकांना कोरोना चाचणी करून घेण्याबाबत आवाहन केले होते त्याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. ही कोरोना चाचणी मंचर ग्रामपंचायत प्रशासनाने ६ ठिकाणी ठेवली होती त्यातील ४ ठिकाणी नागरिकांच्या चाचणीसोबतच लसीकरणाची सोय ही केल्यामुळे प्रशासनाचा चाचणी सोबतच लसीकरणाचा कार्यक्रमही चांगल्यारीतीने पार पडला.
या कोरोना चाचण्यांच्या ठिकाणी शिरूर लोकसभेचे माजी खासदार श्री.शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी ही भेट देऊन शहरात होत असलेल्या कोरोना चाचण्यांचा तसेच लसीकरणाचा आढावा घेतला. त्यावेळी माजी खासदार आढळराव पाटील यांनी कोरोनाबाबत च्या परिस्थितीवर बोलताना राज्यातील ऑक्सिजन तसेच रेमडिसीवर च्या तुटवड्या बाबत राज्य सरकार अत्यंत जलद रीतीने योग्य ती पाऊले उचलत असून हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन तसेच रेमडिसीवर इंजेक्शन ची मागणी पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार योग्य ती पाऊले उचलत आहे असे सांगितले तसेच मंचर ग्रामपंचायत प्रशासनाने राबवलेल्या कोरोना चाचणी सोबतच लसीकरणाच्या या उपक्रमाचे कौतुक केले व नागरिकांनीही स्वतः सोबतच स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे व प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून विनाकारण घराबाहेर येण्याचे टाळावे असे आवाहन ही त्यांनी नागरिकांना केले.
यावेळी पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांना अवसरी येथील कोविड सेंटर मध्ये तसेच जास्त संसर्ग असलेल्या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याचे उपसरपंच युवराज बाणखेले यांनी सांगितले तसेच या तपासणी अभियान दरम्यान सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल व नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानून सर्व नागरिकांनी प्रशासनाने लॉकडाऊन संदर्भात दिलेल्या नियमांचे पालन करून नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडता स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन उपसरपंच युवराज बाणखेले यांनी केले