सत्तेचा गैरवापर करुन लोकप्रतिनिधींना डांबून ठेवण्याचे काम मागचे सहा महिने-वर्षभरात झाले – शरद पवार

३१ डिसेंबर २०२२


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बारामती येथे आले असताना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. अनिल देशमुख यांच्या सुटकेवर बोलत असताना ते म्हणाले की, सत्तेचा गैरवापर होतोय, हे आम्ही सातत्याने सांगतोय. अनिल देशमुख, संजय राऊत यांच्याबाबत हे दिसून आले आहे. ज्या लोकांना आत टाकलं, त्यांच्याबद्दल काही आढळलं नाही, हे न्यायदेवतेने देखील सांगितले आहे. सत्तेचा गैरवापर करुन लोकप्रतिनिधींना डांबून ठेवण्याचे काम मागचे सहा महिने वर्षभरात झाले. याच्यामधून सरकारचा दृष्टीकोन चुकीचा आहे, हे कोर्टाच्या माध्यमातून संबंध देशाच्या समोर आले आहे. सरकारने याच्यातून काहीतरी शिकावे, एवढीच अपेक्षा.

पवार यांनी यावेळी संसदेचे अधिवेशन ज्याप्रकारे सुरु आहे, त्यावर नाराजी व्यक्त केली. “संसदेच्या अधिवेशनात काहीही होऊ शकत नाही. विरोधकांना बोलू द्यायचं नाही, अशी सत्ताधारी पक्षाची भूमिका आहे. सभागृहात गोंधळ घालायचा आणि त्यांना हव्या त्या बाबी मंजूर करुन घ्यायच्या. दुर्दैवाने हे चित्र किती दिवस चालू द्यायचे याचा विचार विरोधकांनाही करावा लागेल. जानेवारी महिन्यात नव्या अधिवेशनाची सुरुवात होईल, फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. सत्ताधारी पक्षाने राष्ट्राचा विचार करत संसदेचा दर्जा राखण्याची भूमिका घेऊन पावले टाकली पाहीजेत. विरोधक म्हणून आम्ही सहकार्य करु.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *