मंदिरातील चोरीचा छडा अल्पावधीत लावल्याने, ढोकसांगवी ग्रामस्थांनी रांजणगाव पोलिसांचा केला सन्मान

विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. ३० ऑगस्ट २०२३.


शिरूर तालुक्यातील मौजे ढोकसांगवी येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवाचे, चोरीला गेलेले दागिने ढोकसांगवी ग्रामस्थांकडे रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सुपूर्द केले. या दागिन्यांचा अल्पावधीतच छडा लावण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेय. येथील ग्रामदैवत असलेले श्री खंडोबा देवाचे अडीच ग्रॅम सोन्याचे डोळे अज्ञात चोरट्यांनी गेल्या महिन्यात चोरुन नेले होते. याबाबत देवाचे पुजारी शरद गुरव यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली, रांजणगाव पोलिसांनी या तपास कामी विविध ठिकाणी पोलिस पथके पाठवून या दागिने चोरीचा छडा लावून मुद्देमाल जप्त करत आरोपीस जेरबंद करण्यात आले. या चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करुन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन, ग्रामदैवत श्री खंडोबा देवाचे डोळे ग्रामस्थांकडे सुपूर्द करण्यात आलेत. त्यानंतर धार्मिक विधी व पूजा अर्चा करण्यात येऊन हे सोन्याचे डोळे देवाला बसविण्यात आले.


दरम्यान याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत समस्त ढोकसांगवी ग्रामस्थांच्या वतीने, रांजणगावचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण, पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहाय्यक फौजदार दत्ता शिंदे, विजय शिंदे व ब्रम्हा पोवार यांचा फेटा बांधून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून, शनिवार दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी यथोचित असा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच शोभा शेलार, माजी सरपंच खंडू मलगुंडे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय पाचंगे, सोसायटीचे अध्यक्ष बाबुराव पाचंगे, दशरथ पाचंगे, आंबेगाव शिरुर काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत पाचंगे, भाऊसाहेब पाचंगे, पोलिस पाटील दिपक मलगुंडे, बापू मलगुंडे, रावसाहेब पाचंगे, रणजित पाचंगे, उदय पाचंगे, रामदास मलगुंडे, दशरथ शेलार, विनायक मलगुंडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी रांजणगाव पोलिसांच्या वतीने माजी सैनिक भाऊसाहेब पाचंगे व वीर पत्नी अनिता पाचंगे यांचा पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पत्रकार पोपटराव पाचंगे यांनी केले. तर आभार विद्यालयाचे मुख्याद्यापक बाळासाहेब सोनवणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *