संजय राऊत यांना अडचणीत आणणाऱ्या स्वप्ना पाटकर कोण आहेत ?

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ ऑगस्ट २०२२


शिवसेनेच्या टीकाकारांना सातत्यानं अंगावर घेणारे, महाविकास आघाडीसाठी ढाल बनलेले खासदार संजय राऊत अडचणीत सापडले आहेत. पत्रा चाळ घोटाळ्यात सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) त्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात मनी लॉण्ड्रिंगचे आरोप झाले आहेत. या प्रकरणात आणखी एक नाव समोर आलं आहे. स्वप्ना पाटकर.पत्रा चाळ घोटाळ्यात सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) त्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात मनी लॉण्ड्रिंगचे आरोप झाले आहेत. या प्रकरणात आणखी एक नाव समोर आलं आहे. स्वप्ना पाटकर. २९ जुलैला एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ही ऑडिओ क्लिप राऊत आणि पाटकर यांच्या संभाषणाची आहे. त्यात राऊत यांनी पाटकर यांना शिवीगाळ करत धमकी दिली आहे.

स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला. भारतीय दंड विधानाच्या कलम ५०९, ५०६ आणि ५०४ अंतर्गत राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पाटकर या पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधातील साक्षीदार आहेत. पाटकर या मुंबईतील सांताक्रूझमध्ये राहतात. त्या मानसोपचारतज्ज्ञ आहेत. त्यांचं स्वत:चं क्लिनिक आहे.स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची भेट २००७ मध्ये झाली. त्यावेळी राऊत वर्तमानपत्रात कार्यकारी संपादक होते. राऊत यांच्याशी ओळख कशी झाली आणि पुढे काय घडलं, याची माहिती पाटकर यांनी पोलिसांना दिली आहे. २००७ मध्ये पाटकर आणि राऊत यांची पहिली भेट झाली. हळूहळू कौटुंबिक संबंध वाढत गेले, असं पाटकर यांनी पोलिसांना सांगितलं. मी व्यवसायिक भागिदार व्हावी, अशी राऊत यांची इच्छा होती. मात्र त्यासाठी मी स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे संजय राऊत खूप नाराज झाले. २० नोव्हेंबर २०१६ मध्ये राऊत यांना भेटण्यासाठी मी त्यांच्या कार्यालयात गेले. त्यावेळी त्यांनी माझा हात पकडला. ते जोरजोरात माझ्यावर ओरडू लागले. पोलीस कारवाईची धमकी देऊ लागले, असं पाटकर यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *