नागपंचमीनिमित्त श्रीराम पतसंस्था व लायन्स क्लबच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)


पैठणीच्या मानकरी ठरल्या धनश्री कोल्हे

नागपंचमी सणाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी व नारायणगाव येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नागपंचमी महोत्सव नारायणगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला व मुलांचे दोरीमलखांब व मलखांब याबरोबरच होम मिनिस्टर खेळ रंगला वहिनींचा हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात धनश्री कोल्हे यांनी प्रथम क्रमांक मिळवून पैठणी साडी पटकावली.


हे या कार्यक्रमाचे सलग बारावे वर्षे होते. यावेळी प्रमुख पाहुणे रीजन चेअरमन रिजन ५ चे लायन आनंद खंडेलवाल, कॅबिनेट ऑफिसर लायन प्रदीप कुलकर्णी, झोन चेअरमन लायन विक्रम माने, झोन चेअरमन शिवनेरी लायन शिरीष जठार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .
या कार्यक्रम प्रसंगी कांदळी सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके, श्रीराम पतसंस्थेचे चेअरमन तानाजी डेरे, व्हॉइस चेअरमन शशिकांत वाजगे, राजश्री बेनके, डॉ सदानंद राऊत, संचालक मंडळ तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट इन्चार्ज लायन दीपक वारुळे व लायन जितेंद्र गुंजाळ होते. लायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश रायकर, सचिव राजेंद्र देसाई, खजिनदार लायन संजय शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमास शिवनेरी लायन्स क्लबचे सर्व सभासद उपस्थित होते.
यावेळी पारंपरिक खेळ मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मुलींचे दोरीमल्लखांब व मुलांचे मल्लखांब सादर करण्यात आले. जवळपास १५० मल्ल यात सहभागी झाले होते.
याप्रसंगी महिलांंसाठी खास बाळकृष्ण नेहरकर यांचा होम मिनिस्टर हा धमाल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच महिलांचे नृत्य व विविध खेळ घेण्यात आले. यावेळी सुमारे अडीच हजार महिला उपस्थित होत्या . श्रीराम पतसंस्थे तर्फे पाच आकर्षक पैठणी व विनोद सेल्स तर्फे कोहिनूर आटा चक्की लकी ड्रॉ मध्ये महिलांना देण्यात आली. याबरोबरच विविध भेटवस्तू देखील महिलांना देण्यात आल्या.
होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला वहिनींचा या कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक धनश्री कोल्हे, द्वितीय हर्षदा कोराळे, तृतीय सुवर्णा गणेश कोराळे, चतुर्थ सुनंदा जायकर, पाचवा क्रमांक कलावती जाधव यांनी मिळवला.