
मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
ओझर – दि.१३ मे २०२१
पुणे ग्रामीणमध्ये कोरोना पश्चात बुरशीजन्य आजार म्यूकोर मायकोसिसचा पहिला रुग्ण जुन्नर तालुक्यात आढळलेला आहे. जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी गावात एका ६५ वर्षीय महिलेला कोरोनातून बरे झाल्यानंतर ३ दिवसांनी बुरशीजन्य आजार म्यूकोर मायकोसिसचा संसर्गजन्य आजार झाल्याची घटना समोर आल आहे. नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे मेडीकल फाउंडेशनच्या अथर्व नेत्रालय नारायणगाव येथे हि स्त्री डोळे तपासणीसाठी आलेअसता हि बाब निदर्शनास आली आहे .

कोरोनानंतर ज्या व्यक्तींना मधूमेह आहे अशा व्यक्तींना या आजाराची लागण होते. त्यामुळे अगोदरच कोरोनाने बेहाल झालेल्या जुन्नर तालुक्याची डोके दुखी मात्र निश्चितपणे वाढणार आहे. यामध्ये नाकात व डोळ्यांमध्ये बुरशी तयार होऊन डोळ्यांना लाली येते. सुरूवातीच्या काळात यावर योग्यवेळी उपचार झालले तर हा रोग बरा होतो. परंतु या रोगाकडे दुर्लक्ष केल्यास या आजाराची गंभीरता वाढत जाऊन हि बुरशी मेंदू पर्यंत पोहोचते व रुग्नाची परिस्थिती गंभीर होते. त्यामुळे कोरोनानंतर डोळे व नाकासंबधी काही तक्रारी आढळल्यास ताबडतोब संबंधित डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे , असे डॉ. मनोहर डोळे रूग्नालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संदीप डोळे यांनी स्पष्ट केले आहे.त

सेच ह्या आजाराला घाबरून न जाता प्रथमोपचार करणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. कोरोनाने जुन्नर तालुक्यात अगोदरच हाहाकार माजवलेला असताना म्यूकोर मायकोसिस नावाच्या बुरशीजन्य आजाराचे आगमनही आता पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झाले आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्याच्या जनतेने , सावधानता बाळगणे गरजेचे आहे .