विविध क्षेत्रातील नवदूर्गांचा युवक काँग्रेस कडून सन्मान

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१६ ऑक्टोबर २०२१

पिंपरी

सार्वजनिक नवरात्र उत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने दसरा या शुभ दिनाचे औचित्य साधत ९ विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून स्वःकर्तृत्व सिध्द केलेल्या ९ कर्तृत्ववान स्त्रीयांचा सन्मान “नवदूर्गा स्त्री सन्मान पुरस्कार” देऊन करण्यात आला. पुरस्कारांचे स्वरूप हे सन्मानचिन्ह, साडी व पुष्पगुच्छ असे होते.

पिंपरी खराळवाडी येथील हिंद कामगार संघटनेच्या हॅाल मध्ये या काही पुरस्कारांचे वितरण अखिल भारतीय काँग्रेस चे सचिव पृथ्वीराज साठे, काँग्रेस चे शहराध्यक्ष डॅा. कैलास कदम, माजी नगरसेवक सदगुरू कदम,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे व इंटकचे सरचिटणीस मनोहर गडेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर काही पुरस्कार हे पुरस्कारार्थीं कडे प्रत्यक्ष जाऊन प्रदान करण्यात आले.

विविध क्षेत्रातील नवदूर्गांचा युवक काँग्रेस कडून सन्मान

विविध ९ क्षेत्रांतून, मा.प्रेरणा कट्टे, सहाय्यक पोलिस आयुक्त (पोलिस क्षेत्र) डॅा.विजया आंबेडकर, डॅाक्टर पिंचिंमनपा रूग्णालय (वैद्यकीय क्षेत्र) मा. सोनल बुंदेले, आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक धनुर्विद्या (क्रिडा क्षेत्र) मा. सविता रंधवे, पिं चिं मनपा शालेय शिक्षिका (शैक्षणिक क्षेत्र) मा. आशाताई बोडके मेस संचालिका, (उद्योजक क्षेत्र) मा. ॲड. स्मिता मलशेट्टी, क्राईम लॅायर (वकिली क्षेत्र) मा. आशा साळवी (पत्रकारिता क्षेत्र) मा. मृणमयी गोंधळेकर, नृत्यांगणा (कला क्षेत्र) मा. सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त क्रीडा, कला व सांस्कृतीक विभाग पिं चिं मनपा (प्रशासकिय क्षेत्र) यांची निवड करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना पुरस्कारार्थींनी या सन्मानाबाबत धन्यवाद व्यक्त केले व मा. सोनल बुंदेले म्हणाल्या, राजकीय पक्षांकडून खेळांडूचे अशा प्रकारचे सन्मान क्वचित होताना दिसतात ते अधिकाधिक व्हावेत त्यामुळे कार्यास अधिक उर्जा मिळते. व शहरात खेळाडू घडविण्यास प्रोत्साहन मिळेल. सविता रंधवे म्हणाल्या, आमचा हा सन्मान इतर सन्मानांपेक्षा वेगळा आहे, साडी हि स्री चे उर्जाचे व शक्तीचे प्रतीक आहे ते देऊन झालेला सन्मान मनाला भावतो आहे.

या प्रसंगी एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष ॲड उमेश खंदारे, पिपंरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, युवक काँग्रेस चे शहर सरचिटणीस बाबा गायसमुद्रे, मिलिंद बनसोडे, योगेश नायडू, हिंद कामगार संघटनेचे सरचिटणीस हमीद ईनामदार आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *