किरण वाजगे
कार्यकारी संपादक
दि.२२\०८\२०२३
महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच कांदा निर्यातीवर ४०% उत्पादन शुल्क लावल्याच्या निषेधार्थ खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ११ वाजता आळेफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तीव्र शब्दात मोदी सरकारचा समाचार घेतला तसेच केंद्र सरकार कसे शेतकरी विरोधी आहे हे विविध उदाहरणे देत स्पष्ट केले.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
या आंदोलनाला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देवदत्त काँग्रेसचे नेते सत्यशिल शेरकर, पांडुरंग पवार, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, अशोक घोलप, देवराम लांडे, शरद चौधरी, शरद लेंडे, मोहित ढमाले, सुरज वाजगे, मंदाताई दांगट, रघुनाथ लेंडे, बाबा परदेशी, देवराम लांडे जीवन शिंदे, विजय कु-हाडे, अशोक घोडके, अंबादास हांडे, रमेश मेहेत्रे, रोहिदास केदारी, बाजीराव ढोले, रामभाऊ वाळुंज तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रास्ता रोको आंदोलन प्रसंगी रस्त्यावर बसून खासदार डॉक्टर कोल्हे यांच्यासह देवदत्त निकम, सत्यशील शेरकर माऊली खंडागळे व इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव आळेफाटा जुन्नर ओतूर येथील पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी योग्य बंदोबस्त ठेवला.