प्रशासकीय अधिकाऱ्याने लिहिलेल्या ‘ फीरस्त्या ‘ चित्रपटाचा महोत्सवामध्ये डंका…चित्रपटाला देश-विदेशातील विविध ५३ पुरस्कार जाहीर…


” चित्रपट लेखन आणि दिग्दर्शनाचे कोणतेही प्रशिक्षण न घेता केवळ इंटरनेटवरील उपलब्ध माहिती आणि यूट्यूब वरील व्हिडिओ पाहून हा चित्रपट तयार केला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने ५३ पुरस्कार पटकावले आहेत. चित्रपटाचे जगभरात कौतुक होत असल्याने हुरूप वाढला आहे. “

विठ्ठल भोसले – दिग्दर्शक

पुणे प्राप्तीकर विभागातील सहआयुक्त विठ्ठल भोसले यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेला फिरस्त्या हा मराठी चित्रपट जागतिक पातळीवर नावाजला गेला आहे. परदेशातील विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शनापूर्वीच फिरस्त्या या चित्रपटाने ५३ पुरस्कार पटकावले आहेत. निराशेच्या गर्तेत अडकलेल्यांना आत्मविश्वास देणाऱ्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
फिरस्त्या हा चित्रपट प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यशापर्यंत पोहोचण्याची धडपड करणाऱ्या खेडेगावातील एका होतकरू मुलाची प्रेरणादाई गोष्ट आहे. फीरस्त्याने प्रदर्शनापूर्वी भारत, अमेरिका, रशिया ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, स्वीडन, सिंगापूर, चेक रिपब्लिक आणि सोमानीया या देशातील २४ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ५३ पुरस्कार जिंकले आहेत. या ११ देशांमध्ये फिरस्त्या चित्रपटाचे कौतुक होत आहे. असे निर्मात्या डॉ. स्वप्ना भोसले यांनी सांगितले. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून अठरा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे १७ पुरस्कार जाहीर झाले आहेत.
सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी ५ तर समीर परांजपे यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ०६ ठिकाणी गौरविण्यात आले आहेत. समर्थ जाधव सर्वोत्कृष्ट अभिनेता, गिरीश जांभळीकर सर्वोत्कृष्ट छायाचित्रीकरण, प्रमोद कहार सर्वोत्कृष्ट संकलन यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. अमेरिका, रशिया, स्वीडन आणि तुर्की या देशांमधील चित्रपट महोत्सवात फिरस्त्याची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ऐनवेळी रद्द झालेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धा विभागात या चित्रपटाची निवड झाली आहे अशी माहिती भोसले यांनी दिली.

भोसले यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी हे आहे. झुंजार मोशन पिक्चर ची निर्मिती असलेल्या फिरस्त्या मध्ये समीर परांजपे, हरीश ६५ बारस्कर मयुरी कापडणे, अंजली जोगळेकर, श्रावणी अभंग, समर्थ जाधव, आदेश शंकर आदिनी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *