चांदणी चौकातील मार्गाचे लोकार्पण सोहळा आज केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पार पडणार.
भूसंपादन अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून चांदणी चौकातील उड्डाणपलासह रस्त्यांची कामे पूर्ण झाले आहेत .त्याच अनुषंगाने आज केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चौकातील मार्गाचे लोकार्पण सोहळा आज पुण्यात पार पडणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देखील उपस्थित राहणार होते पण आज काही कारणास्तव त्यांचा अचानक दौरा रद्द झाल्याने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे समजले जात आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे उपस्थित राहणार असून यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचे समजले जात आहे यापूर्वी या कामाला एक मे आणि 15 जुलै असा मुहूर्त मिळाला होता या चौकातील कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते .मात्र काही काम झाल्यानंतर रस्त्याच्या भूसंपादनासाठी महापालिकेला अनेक अडथळे आले त्यामुळे हे काम रखडले गेले त्यानंतर या चौकात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या होती दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या वाहतूक कोंडीत अडकलेले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या कोंडीचा अनुभव घेतल्यानंतर मात्र या समस्येवर तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले त्यानंतर भूसंपादनासह या चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याबाबतच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावर देखील यशस्वीपणे मात करीत हे काम आता पूर्ण झाले आहे. पालिकेला भूसंपादनासाठी सुमारे 400 कोटी तसेच प्रत्यक्षात उड्डाणपूल उभारण्यासह अन्य रस्त्यांची कामे करण्यासाठी 460 कोटी रुपयांचा खर्च या कामासाठी आला आहे. गडकरी यांनी यापूर्वीच याचे उद्घाटन एक मे रोजी होईल असे जाहीर केले होते .मात्र तो मुहूर्त हुकल्यानंतर 12 जुलै हा दिवस जाहीर केला आता या पुलाचे उद्घाटन आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन आज होणार आहे. या चांदणी चौकशी नाव बदलून एनडीए नाव द्या पुण्यातील चेंज इंडिया संस्थेने मागणी केली आहे तसेच आज पुण्यात एनडीए नाव देण्यासाठी सह्यांची मोहीम देखील आज पुण्यात राबवली जात आहे त्यामुळे एकीकडे या लोकार्पण सोहळा पार पडताना दुसरीकडे या चांदणी चौकाचे नाव बदलून एनडीए नाव द्या अशी मागणी जोर धरत आहे
पै मंगलदास बांदल मित्रपरिवाराने शिक्रापूरच्या मलंगशाह दर्गा सुधारणेसाठी दिली लाखोंची मदत
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे शिक्रापूर (शिरूर) : दि. १२/०८/२०२३. पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती…