अमित शहा यांनी मध्यस्थी केली म्हणजे नेमके काय केले; संजय राऊत यांचा सरकारला सवाल

२२ डिसेंबर २०२२


सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जाणूनबुजून आग लावण्याचा प्रयत्न करीत असून महाराष्ट्राचा रोज अपमान करीत आहेत. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केली म्हणजे नेमके काय केले, अशी विचारणा करीत परिस्थिती ‘जैसे थे’असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राला एक इंचभरही जमीन देणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले असून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सीमाप्रश्नी जनतेच्या भावना तीव्र असून एकमेकांशी सौहार्द ठेवून न्यायालयीन व कायदेशीर संघर्ष करणे अपेक्षित होते. दोन्ही राज्ये एकाच देशाचे घटक आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जर भूमिका घेत नसतील, तर ते या पदावर बसण्यास लायक नाहीत. अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले असताना गुंगीचे औषध दिले का? एवढे हतबल सरकार कधी बघितले नव्हते, असे राऊत यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *