विद्याधाम सहकारी गृहनिर्माण सोसायटीने काढला कचऱ्यावर रामबाण उपाय

बेल्हे (वार्ताहर:- विभागीय संपादक रामदास सांगळे):- आळेफाटा शहरात दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या वाढत असून विद्याधाम गृहनिर्माण सोसायटी आळेफाटा (ता.जुन्नर) नव्याने कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की आळेफाटा व परिसरामध्ये दिवसेंदिवस कचऱ्याची फार गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आळे व वडगाव आनंद दोन्ही ग्रामपंचायतीच्या वादात कचरा पडलेला असतो.रस्त्याच्या कडेला,बसस्थानक परिसरात नागरिकांना,प्रवाशांना, रहिवाश्यांना कचऱ्याची दुर्गंधी येत असते.वारंवार तक्रारी करूनही कचऱ्याची समस्या अद्याप तशीच आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढणेकामी सोसायटी च्या वतीने पुढाकार घेऊन सुमारे ३ लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायत वडगाव आनंद च्या सहकार्यातून हा प्रकल्प तयार करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील औटी यांनी सांगितले.

सदर प्रकल्पा पासून उत्तम दर्जाचे खत निर्माण होईल तसेच पर्यावरण पूरक सोसायटी म्हणून विद्याधाम सोसायटीची नव्याने ओळख होईल. पुणे जिल्ह्यात गृह निर्माण सोसायटी मधील हा पहिला प्रकल्प असून इतरांसाठी मॉडेल म्हणून नक्कीच असेल असे पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे यांनी सांगितले. तसेच पंचायत समिती मार्फत सदर प्रकल्पास आर्थिक सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. सर्व सोसायटी मध्ये अशा प्रकारचे प्रकल्प तयार करावेत असेही त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

ग्रामपंचायत वडगाव आनंद मार्फत सुमारे १ लाख रुपये अनुदान सदर प्रकल्पासाठी देण्याचे सरपंच, उपसरपंच यांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य डी. बी वाळुंज यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, वडगाव आनंद चे सरपंच शशी लाड व उपसरपंच संतोष चौगुले, माजी सरपंच लता चौगुले,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गडगे, डी.बी.वाळुंज, सतीश पाटील औटी, संतोष शिंदे, सुरेश गडगे, के.टी. गडगे, शशि देवकर, सोसायटी च्या सचिव रेश्मा गुळवे, संचालक प्रदीप अण्णा चौगुले, डॉ. योगेश भुजबळ, भास्कर बांगर, अंकुश घाडगे, पोपट शिंदे, अमृत बनसोडे, महादेव संभेराव तसेच सोसायटी मधील सर्व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अरुण गुळवे व आभार प्रदर्शन सुदाम ढमाले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *