नारायणगाव : इनरव्हील क्लब नारायणगाव यांच्या वतीने जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील महत्त्वाचे गाव असलेल्या निमगाव सावा येथील पंडित नेहरू विद्यामंदिरातील सातवी ते बारावी या वर्गातील कुमारी व युवतींना “मासिक पाळी आणि घ्यावयाची काळजी” या विषयी नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले.
नारायणगाव येथील डॉ केतकी काचळे यांनी मुलींना मासिक पाळी व वयात येताना होणारे बदल व त्याविषयी घ्यावयाची काळजी याबाबतचे शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थिनींना इनरव्हील क्लब च्या वतीने मोफत सॅनिटरी नॅपकिन मोफत देण्यात आले. या कार्यक्रमासाठी क्लबच्या अध्यक्षा प्रीती शहा, सेक्रेटरी रश्मी थोरवे, संस्थापिका अंजली खैरे, सुनीता चासकर समृद्धी वाजगे,श्रीमती मुदगल, सविता खैरे, सौ सोमवंशी, शाळेच्या शिक्षिका व इतर संचालिका उपस्थित होत्या