आदर्श गाव बस्ती येथील शाळांमध्ये नवागतांचे उत्साहात स्वागत

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१६ जून २०२२

नारायणगाव


बुधवार दिनांक १५ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. श्रीक्षेत्र बस्ती (ता जुन्नर) येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक व ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. ही आवडते मज मनापासुनी शाळा लाविते लळा ही जशी माऊली बाळा.” दोन वर्षांच्या लॉकडाउनच्या कालावधीनंतर आज पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचा चिवचिवाट ऐकायला आला आणि मनस्वी आनंद झाला.


“आनंदाने भरला मेळा, चला चला सुरु झाली शाळा” असे म्हणत आपल्या आईचा हात धरून मुले शाळेत दाखल झाले. सर्व सन्मानिय ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य त्याचप्रमाणे आदर्श गाव श्रीक्षेत्र बस्ती प्रथम नागरिक प्रकाशशेठ गिदे, प्रा.अमोल गोरडे, अमित गोरडे, श्री.मनोज बोऱ्हाडे , श्री.गणेश शेलार ,दिनेश काजळे आदी मान्यवर मेळाव्यासाठी उपस्थित होते. प्रथम विद्यार्थ्यांचे प्रभातफेरी काढून औक्षण करून गुलाब पुष्प देण्यात आले. गिफ्ट म्हणून पेन्सिल पाऊच वह्याचे वाटप करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले.

दोन वर्ष लॉकडाउन नंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचा चिवचिवाट

शाळा पूर्वतयारी मेळावा एप्रिल महिन्यामध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक त्या पार्श्वभूमीवर पूर्ण महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी काय तयारी केली. यासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल आणि पालकांनी घेतलेली कृती याविषयी अंगणवाडी सेविका आणि शिक्षिका यांनी केलेल मार्गदर्शन विद्यार्थ्यांमध्ये योग्य तो बदल दिसून आला. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. आनंददायी वातावरणामध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न झाला.


आज सीड बॉल कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात आले. यात प्रामुख्याने जांभूळ, सीताफळ, रामफळ, चिंचोके व कापूस इत्यादी बियांचे सीड बॉल तयार करण्यात आले. याबरोबर पर्यावरणाचा संदेश देण्यात आला “झाडे लावा झाडे जगवा.” “पर्यावरणाचे रक्षण, वसुंधरेचे रक्षण” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंत्रस्नेही शिक्षिका संगिता ढमाले मॅडम यांनी केले. गावचे प्रथम नागरिक माननीय प्रकाश शेठ गिदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेला सर्व परीने सहकार्य करण्याचे संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आश्वासन देण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा हांडे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *