पुण्यात सीएनजी दर वाढले, प्रतिकिलो मागे एक रुपयांची दरवाढ

१६ नोव्हेंबर २०२२

पुणे


दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बड्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहे. जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता सीएनजी च दर वाढले आहेत. त्यामुळे सीएनजी वापरणाऱ्यांना आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.

पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजी दरात प्रति किलो एक रुपयांची वाढ करण्यात आली असून 92 रुपये प्रति किलो या दराने  शहरात सीएनजी मिळणार आहे. मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. पुण्यात चार महिन्यानंतर ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *