बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिक्रापूर (शिरूर) : दि. १२/०८/२०२३.
पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती पैलवान मंगलदास बांदल (आप्पा) ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सासवडे परिवार व पै. मंगलदास बांदल मित्र परिवार ह्यांच्या वतीने मलंगशाह दर्गा शिक्रापूर सुधारणा करण्यासाठी, सुमारे तीस हजार बांधकामाची वीट (किंमत रु दोन लाख) एवढी देणगी दर्गा कमिटीकडे सुपूर्द केलीय. तसेच दर्गा सुशोभीकरणासाठी वीस लाख रुपये जिल्हा नियोजन निधीद्वारे उपलब्ध करून देण्याची घोषणाही यावेळी माजी सरपंच पै. रामभाऊ सासवडे यांनी केली.
यावेळी माजी आदर्श सरपंच पै रामभाऊ सासवडे, सरपंच रमेश गडदे, राजाभाऊ मांढरे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, कृष्णा सासवडे, अनिल राऊत, तानाजी राऊत, जयाभाऊ विरोळे, शंकर वाबळे, दिलीप कोठावळे, विजय लोखंडे, अशोक शहाणे, अर्जुन शिर्के, प्रकाश चव्हाण, विठ्ठल सासवडे, दत्ता राऊत, गोरख कुंभार, अशोक तक्ते, मछिंद्र महाजन, बाळासाहेब शेळके, बापूसाहेब शिंदे, गणेश गायकवाड, अतुल सासवडे, मुन्ना तांबोळी, युन्नूस तांबोळी, मोहम्मद तांबोळी, आयुब तांबोळी, मुबारक तांबोळी, हारून इनामदार, अली तांबोळी, अमीर तांबोळी, बंटी तांबोळी, आदित्य सासवडे, महेश सासवडे, अजिंक्य सासवडे, तोफीक तांबोळी, बबलू शेख आदी ग्रामस्थ व दर्गा कमिटीचे सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.